एकशे ऐंशी कोटी खर्चून केलेल्या महामार्गावर पडत आहेत खड्डे ! मुरूमाने खड्डे बुजवून बांधकाम विभागाचा प्रताप

By : Polticalface Team ,14-12-2024

एकशे ऐंशी कोटी खर्चून केलेल्या महामार्गावर पडत आहेत खड्डे ! मुरूमाने खड्डे बुजवून बांधकाम विभागाचा प्रताप करमाळा दि १४ प्रतिनिधी कोर्टी ते आवाटी राज्य महामार्ग क्रमांक ६८ या एकशे ऐंशी कोटी खर्चून तयार केलेल्या या महामार्गावर वर्षभरात भले मोठे खड्डे पडायला सुरवात झाली . महामार्ग असल्याने अचानक खड्डा आल्यानंतर वेगात असलेली वाहणे खड्ड्यात आदळून मोठे नुकसान होत आहे तर खड्डा चुकवण्याच्या नादात या रस्त्यावर अपघात देखील घडले आहेत. पांडे येथील वळणांवर पडलेल्या या खड्यांचा अंदाज न आल्याने स्थानिक पत्रकार अविनाश जोशी यांच्या पत्नी मोटारसायकल वरून पडून गंभीर जखमी झाल्या आहेत. बांधकाम विभाग तसेच संबंधित एनपी कन्स्ट्रक्शन कंपनीकडून डोळेझाक होत आहे. मुरूमाने खड्डे बुजवण्याचा प्रताप बांधकाम विभागाकडून करण्यात आला आहे. वाहणे जावून हा मुरूम पुन्हा रस्त्यावर उडून येत असल्याने धोकादायक परस्थीती निर्माण झाली आहे. या रस्त्याचे काम सुरू असताना बांधकाम विभाग तसेच क्वालिटी कंट्रोल व देखरेख करण्यासाठी असलेले शासकीय अभियंते यांच्यात मिलीभगत झाल्याने या महामार्गच्या कामात कोट्यवधी रूपयाचा गैरव्यवहार झाला असल्यानेच या रस्त्यावर वर्षभरातच खड्डे पडायला सुरवात झाली .अनेक ठिकाणी हा रस्ता खचला होता त्यानंतर पुन्हा तेवढीच पट्टी उखडून दुरूस्त केली जात आहे. अनेक ठिकाणी चढउतार झाल्याने वेगात असलेल्या वाहनांचा ताबा सुटत असल्याने अनेक चारचाकी वाहने पलटी होवुन अनेकांना जीव गमवावा लागला आहे तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. ___________________________________________ या रस्त्याचे काम निष्काळजी पने केल्याने रस्त्यावर खड्डे पडत आहेत. दोन महिन्यापासून या ठिकाणावर खड्डे आहेत या संदर्भात अनेक वेळा बांधकाम विभागास सुचना केल्या मात्र अत्यंत धोकादायक ठिकाणचे खड्डे बुजवायला वेळ भेटत नाही हे दुर्दैव आहे. अंकूश जाधव ( माजी सरपंच शेलगाव) ___________________________________________ एन पी कन्स्ट्रक्शन कंपनीकडून हे काम अनेक वर्ष रेंगाळले होते .मुदत संपत आल्याने शेवटच्या काही दिवसात रात्रंदिवस काम करून काम उरकून घेतले . कोट्यवधी रूपय खर्चून होत असलेल्या महामार्गाचे काम करत आसताना क्वालिटी कंट्रोल, बांधकाम विभाग यांनी कामाच्या दर्जा कडे अर्थपुर्ण दुर्लक्ष केल्यानेच हा रस्ता लवकर खराब होत आहे.या रस्त्याच्या कामाच्या क्वालिटीची केंद्रीय समीती मार्फत चौकशी करणे गरजेचे आहे. शंभूराजे फरतडे (युवासेना तालुकाप्रमुख ठाकरे)
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.