नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी श्री नेटवटे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले ! लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याची दहशत कायम

By : Polticalface Team ,16-12-2024

नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी श्री नेटवटे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले !  लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याची दहशत कायम

लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे बिबट्याची दहशत थांबता थांबेना! वारंवार येथील शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन होत असल्याने लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी भयभीत झाल्याचे दिसून येत असून चक्क बिबट्याने शेतकऱ्याच्या अंगावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान लोणी व्यंकनाथ येथे गेल्या एक महिन्यापासून वाड्यां वस्त्यांवर रात्री अप रात्री बिबटे येत असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या; मेंढ्या व पाळीव जनावरांवर बिबट्या हल्ले करत असून; आता बिबट्याने शेतकऱ्यांवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार लोणी व्यंकनाथ येथील गरीब कुटुंबातील शेतकरी बाळासाहेब श्रावण नेटवटे हे रात्री लोड शेडिंग नुसार आपल्या शेतातील गहू पिकाला पाणी देत असताना अचानक समोरून बिबट्याने डरकाळी टाकली. आणि थेट बाळासाहेब नेटवटे यांच्या दिशेने बिबट्या धावत आला. प्रसंगावधान राखून श्री नेटवटे यांनी बिबट्या येत असल्याचे पाहताच आपल्या घराकडे बिबट्या पासन बचाव करण्यासाठी धाव घेतली. घरातून श्री नेटवटे यांनी काठी हातात घेऊन जागेवर आदळली. त्यामुळे बिबट्याने पुन्हा आपली पाठ फिरवली. अन्यथा वेळ आली होती परंतु काळ आला नव्हता. अशा स्थिती निर्माण झाली होती. बाळासाहेब नेटवटे यांचे कुटुंब या बिबट्याच्या दहशतीमुळे आजही भयभीत अवस्थेत आहेत. गेल्या वर्षी देखील या नेटवटे कुटुंबाची बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला होता. आता पुन्हा बिबट्याने याच परिसरात शेतकरी व प्राण्यांवर हल्ला करण्यासाठी बेधडक बिबटे हे धावून येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या बिबट्याच्या दहशतमुळे शेतकरी व शेतमजूर कामावर येण्याची धाडस करत नाही. त्यामुळे शेतीउद्योग धोक्यात येताना दिसतो आहे. मागील काही दिवसांपूर्वी लोणी व्यंकनाथ येथील शेतकरी पांडुरंग शेंडे यांच्या शेळींवर हल्ला करून त्या शेळ्यांचा बळी घेतला आहे.
 
      दरम्यान या घटनेची बाळासाहेब नेटवटे यांनी ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांना घडल्या घटनेची माहिती दिल्यानंतर पत्रकार कुरुमकर यांनी तात्काळ वन विभागाचे अधिकारी श्रीमती घोडके मॅडम यांच्याशी संपर्क साधून घटनास्थळी तात्काळ पाहणी करावी अशा प्रकारे सूचना केल्यानंतर श्रीमती घोडके यांनी वन कर्मचारी श्री संभाजी शिंदे यांना तात्काळ घटनास्थळी पाठवले. यावेळी वन कर्मचारी श्री शिंदे यांनी ज्या ठिकाणी बिबट्याचे दर्शन घडले त्या ठिकाणी सदर बिबट्याचे मोठमोठे पायाचे ठसे दिसून आले सदर ठसे हे बिबट्याचेच असल्याचे वन कर्मचारी श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले यावेळी वन कर्मचारी शिंदे यांनी बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर त्याच्यावर प्रति हल्ला न करता विविध उपाय करण्याच्या सूचना यावेळी श्री शिंदे यांनी यावेळी केल्या. यावेळी यावेळी पत्रकार नंदकुमार कुरुमकर शेतकरी बाळासाहेब नेटवटे एकनाथ नेटवटे हे शेतकरी उपस्थित होते. वन कर्मचारी श्री शिंदे यावेळी म्हणाले की; सद्यस्थितीला कारखान्याचे गाळप हंगाम सुरू आहेत. त्यामुळे ऊसतोड सुरू आहे. उसाचे क्षेत्र मोकळे होत असल्याने बिबट्यांना दडण्यासाठी काहीच राहिले नाही. त्यामुळे बिबटे दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आश्रय घेतात. आणि रात्री भक्षण करण्यासाठी वाड्यावरत्यावरील पाळीव जनावरांवर बेधडक हल्ले करून शेळ्या; मेंढ्यां , व पाळीव कुत्र्यांचे बळी घेत आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी व शेतमजूर भयभीत झाल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे लोणी व्यंकनाथ शिवारात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजऱ्यांची संख्या वाढवावी; अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.


          श्रीगोंदा तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यात अनेक पाळीव प्राणी बळी पडले आहेत. त्यामुळे बिबट्याची दहशत श्रीगोंदा तालुक्यात अनेक भागात मोठ्या प्रमाणावर दिसून येत असून; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. या प्रश्नासंदर्भात ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांनी  घडलेल्या घटनेचा मागोवा घेत प्रशासनाला जागे करण्याचे काम वेळोवेळी करतात. लोणी व्यंकनाथ मध्ये अनेक बिबट्याच्या हल्ल्यात गोरगरीब शेतकऱ्यांच्या शेळ्या; मेंढ्या; बळी गेलेले आहेत. या प्रश्नासंदर्भात पत्रकार कुरुमकर यांनी अनेक गोरगरीब शेतकऱ्यांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आर्थिक मदत मिळवून दिल्याबद्दल शेतकरी बाळासाहेब नेटवटे यांनी पत्रकार कुरुमकर यांचे आभार मानले आहेत.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.