By : Polticalface Team ,16-12-2024
लिंपणगाव ( प्रतिनिधी)-रयत शिक्षण संस्थेच्या महादजी शिंदे विद्यालयात पदवीधर आमदार सत्यजित सुधीर तांबे यांच्या निधीतून संगणक व पोडियम वाटप करण्याचा कार्यक्रम पार पडला. श्रीगोंदा तालुक्यातील विविध शाळांना संगणक व पोडियम वाटप करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलत असताना, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बाजीराव कोरडे यांनी सत्यजित तांबे हे सुधीर तांबे यांचे विचार व वारसा पुढे नेत आहेत, असे विचार व्यक्त केले.
युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांनी बोलताना , विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून सत्यजित तांबे एक अत्याधुनिक युवा नेतृत्व म्हणून उदयास आलेले आहेत, असे प्रतिपादन केले.
सत्यजित तांबे यांचे स्वीय सहाय्यक राजकुमार साळवे यांनी यावेळी बोलताना, श्रीगोंदा तालुक्यातील उर्वरित शाळांना पुढील टप्प्यात मदत देण्यात येईल असे आश्वासन दिले.
यावेळी मंचावर मुख्याध्यापक राजेंद्र कळसकर, भाऊसाहेब शितोळे, पवार सर, राजेंद्र खेडकर हरिश्चंद्र नलगे, मधुकर नागवडे, वसंतराव दरेकर, काळे सर, पवार सर, इनामदार सर भूषण शेळके, आदील शेख पर्यवेक्षक भाऊसाहेब गदादे तसेच विविध शाळांचे प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते.
या मदत मिळवण्याच्या कार्यक्रमासाठी सचिन झगडे संतोष शिंदे, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य दिलीप भुजबळ तर सूत्रसंचालन विलास लबडे आणि आभार विलास दरेकर यांनी केले.
वाचक क्रमांक :