By : Polticalface Team ,16-12-2024
संघर्षनामा वृत्तसेवा l कर्जत दि. डिसेंबर २०२४ प्रतिनिधी, उज्वला उल्हारे मिरजगाव:-येथील महात्मा फुले नूतन महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अहमदनगर जिल्हा क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरविभागीय मुलांच्या नेटबॉल स्पर्धा दिनांक 13 व 14 डिसेंबर 2024 रोजी पार पडल्या.
या स्पर्धेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शारीरिक शिक्षण विभागातील कक्षा अधिकारी श्री. शिवाजी उत्तेकर, माजी उप कुलसचिव श्री.मनोहर कुंजीर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले, यावेळी संघर्षनामा मल्टीमीडिया चे मुख्य संपादक मा. श्री. मेजर भिमराव उल्हारे व पत्रकार कु. उज्वला उल्हारे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ओळख परेड घेऊन सामन्याची सुरुवात करण्यात आली.
या स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा ग्रामीण संघाने विजेतेपद तर पुणे शहर संघाने उपविजेते पद पटकावले. या स्पर्धेचा समारोप रुरल एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा. डॉ. महेंद्र चेडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. त्यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन करून ऑल इंडिया पातळीवरील स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. तानाजी जाधव यांनी मानले.
या स्पर्धेसाठी निवड समिती सदस्य म्हणून प्रा. डॉ. शैलेंद्र कांबळे प्रा.डॉ. विक्रम फाले प्रा. स्वप्निल करपे यांनी काम पाहिले तर पंच म्हणून डॉ. विकास दिघे श्री. अभिजीत सोनवणे श्री. अतुल खोमणे व श्री. हैदर अली यांनी काम पाहिले.
या स्पर्धा पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. राजेंद्रकुमार देवकाते महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. वैभव पवार श्री. हर्षद चौकडे, श्री. सलमान पठाण, श्री सौरभ कांबळे श्री. निखिल चिखले, कु. प्राची खराडे यांनी परिश्रम घेतले.
या स्पर्धा पार पाडण्यासाठी रुरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. डॉ. ए. बी. चेडे संस्थेचे सर्व पदाधिकारी व प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक यांचे मार्गदर्शन लाभले.
वाचक क्रमांक :