By : Polticalface Team ,16-12-2024
श्रीगोंदा प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात श्री गणेशा म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच एका श्री गणेशाची जोरदार चर्चा आहे. श्री गणेशा हा एक आगामी मराठी चित्रपट प्रेक्षकांना मनोरंजनाच्या अनोख्या सफरीवर नेणार आहे. मराठी फॅमिली एन्टरटेनर असलेला श्री गणेशा हा मराठीतील एक धमाल रोड मुव्ही आहे. या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली असून, ट्रेलरलाही तूफान प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या चित्रपटात नेमके काय पाहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट २० डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
श्री गणेशा धमाल रोड ट्रीपचा आणि श्री गणेशा फॅमिली एंटरटेनमेंटचा असे म्हणत खऱ्या अर्थाने रोड ट्रीपच्या रोलर कोस्टर राईडवर नेणाऱ्या श्री गणेशा या फॅमिली एंटरटेनमेंटची प्रस्तुती एमएच-१२ सिने मीडियाने आऊट ऑफ द बॅाक्स फिल्म्सच्या सहयोगाने केली आहे. संजय माणिक भोसले आणि कांचन संजय भोसले या चित्रपटाचे निर्माते, तर रवि माणिक भोसले आणि महेश माणिक भोसले या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. आजवर नेहमीच आशयघन चित्रपटांना विनोदाची किनार जोडत परिपूर्ण मनोरंजनाद्वारे जनमानसापर्यंत मोलाचा संदेश पोहोचवणारे दिग्दर्शक मिलिंद कवडे श्री गणेशाच्या निमित्ताने लाफ्टर आणि मॅडनेसचा डबल धमाका करणार आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट कायम चर्चेत आहे. मिलिंद कवडे आणि प्रथमेश परब ही दिग्दर्शक-अभिनेत्याची सुपरहिट जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आली आहे. त्यामुळे हा चित्रपट म्हणजे मौज, मस्ती आणि धमाल अशी रोलर कोस्टर राईडच ठरणार आहे. प्रथमेशने यापूर्वी साकारलेल्या दगडू आणि टकाटक मधील गण्या नंतर या चित्रपटात त्याच्या रूपातील टिकल्याची कमाल पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात प्रथमेशसोबत मेघा शिंदे ही नवीन नायिका असल्याने नव्या जोडीची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आकर्षित करणार आहे. प्रथमेशच्या सोबतीला शशांक शेंडे हे कोणत्याही भूमिकेला न्याय देण्यास सक्षम असलेले अभिनेते आहेत. त्यांनी यात चक्क दाढी-मिशी चकाचक करून भाऊसाहेब पाटील हे कॅरेक्टर साकारले आहे. भाई वेंगुर्लेकरच्या रूपात संजय नार्वेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांवर मोहिनी घालण्यासाठी सज्ज आहे.
या चित्रपटातील गाणी अगोदरच लोकप्रिय झाली आहेत. आली मधुबाला... हे गाणे चांगलेच पॅाप्युलर झाले असून, टायटल ट्रॅकही संगीतप्रेमींच्या पसंतीस उतरत आहे. हा एक रोड मुव्ही असल्याने यातील कमालीची नेत्रसुखद लोकेशन्स प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणार आहेत. या चित्रपटाबाबत मिलिंद कवडे म्हणाले की, श्री गणेशाच्या रूपात आम्ही आजवर मराठीत कधीही न सादर केलेले कथानक रोड मुव्हीच्या माध्यमातून आणले आहे. यात केवळ विनोद नसून, इमोशन्सही आहेत. यातील नातेसंबंधांची गोष्ट प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आहे. यासाठी प्रत्येक कलाकाराने आपले शंभर टक्के योगदान दिले आहे. प्रथमेश आणि शेंडे यांच्यातील अफलातून टायमिंग प्रेक्षकांना चित्रपट पाहताना अनुभवायला मिळेल. संजय नार्वेकरने आपल्या नेहमीच्या शैलीत केलेली फटकेबाजी आणि नाट्यमय वळणांची पटकथा शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. श्री गणेशाच्या माध्यमातून आपल्या टिमने एक परिपूर्ण कौटुंबिक मनोरंजक चित्रपट रसिकांसमोर सादर केला असल्याचेही कवडे म्हणाले.
दिग्दर्शनासोबत चित्रपटाची कथासुद्धा मिलिंद कवडे यांनीच लिहिली आहे. याखेरीज त्यांनी संजय नवगिरे यांच्या सोबत मिळून पटकथालेखनही केले आहे. संजय नवगिरे यांनी संवादलेखन केले आहे. गीतकार जय अत्रे आणि मंदार चोळकर यांनी गीतलेखन केले असून, संगीतकार वरुण लिखते यांनी त्यावर स्वरसाज चढवला आहे. पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांनी दिले आहे. डीओपी हजरत शेख वली यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, गुरु पाटील यांनी संकलन केले आहे. राहुल ठोंबरे यांनी नृत्य दिग्दर्शन, तर सुमित पाटील कला दिग्दर्शन केले आहे. दिपक एस. कुदळे (पाटील) या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता, तर विनोद शिंदे सहदिग्दर्शक आहेत.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष