By : Polticalface Team ,17-12-2024
लिंपणगाव ( प्रतिनिधी) दि. 16 डिसेंबर रोजी सोमवारी सायंकाळी 4 वाजता मराठी चित्रपट श्री गणेशाची टीम रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात दाखल झाली.
सर्वप्रथम श्री गणेशा चित्रपटातील कलावंत व गावचे सरपंच प्रमोद शिंदे, उपसरपंच राहुल साळवे, स्कूल कमिटी सदस्या सौ नंदिनी काकी वाबळे,व चित्रपट निर्माते तसेच न्यू इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी संजय भोसले व सौ कांचन भोसले इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी , चित्रपटाचे सहनिर्माते रवी भोसले महेश भोसले व त्यांच्या मातोश्री उपस्थित होत्या.
,श्री गणेशा चित्रपटातील समूह व्यासपीठावर याप्रसंगी उपस्थित होता. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक हौसराव दांगडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व कलाकारांचा परिचय करून दिला.पर्यवेक्षक विलास भाऊ सुलाखे उपस्थित होते. विद्यालयाच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
त्यानंतर श्री गणेशा चित्रपटाचे निर्माते संजय भोसले यांनी 20 डिसेंबरला प्रदर्शित होणारा मराठी चित्रपट श्री गणेशा हा चित्रपटात वडील आणि मुलगा यांच्या नात्यातील वास्तव भूमिका मांडण्यात आलेले आहे. हा चित्रपट सर्वांनी आवर्जून पहावे असे त्यांनी सर्व उपस्थितांना व विद्यार्थ्यांना आवाहन केले.टाइमपास चित्रपटातील प्रसिद्ध सिनेकलाकार प्रथमेश परब यांनी आपल्या शैलीत. श्री गणेशा चित्रपटातील काही प्रसंग सांगितले
. सर्व उपस्थित मान्यवरांना जवळपासच्या सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहण्यास आवाहन केले. उपसरपंच राहुल साळवे; संजय भोसले यांच्या संघर्षाविषयी सविस्तर माहिती दिली. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दांगडे यांनी सांगितले की; संजय भोसले हे विद्यालयासाठी लाभलेलं एक अनमोल रत्न आहे. विद्यालयाच्या भौतिक सुविधा साठी एक लाख रुपये इमारत बांधकामासाठी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. येत्या 20 तारखेला प्रदर्शित होणाऱ्या श्री गणेशा चित्रपटास शुभेच्छा व्यक्त केल्या.
या कार्यक्रमास न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाच्या स्कूल कमिटीच्या सदस्या सौ. नंदिनी काकी वाबळे, इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी श्री गणेशा चित्रपटातील कलाकारासमवेत नृत्य करण्याचा आनंद लुटला.