शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा

By : Polticalface Team ,17-12-2024

शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा लिंपणगाव ( प्रतिनिधी )कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक श्री हरून आत्तार यांची भेट घेऊन प्रलंबित मागण्या व समस्या सोडवण्यासाठी सविस्तर चर्चा शिक्षक भारती संघटनेच्या अहमदनगर महिला जिल्हाध्यक्ष रूपालीताई कुरुमकर व श्रीगोंदा तालुकाध्यक्ष रूपालीताई बोरुडे यांनी चर्चा केली विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील भ्रष्ट अधिकारी, लिपिक यांची तात्काळ बदली करावी. मागील ०३ वर्षापासून प्रलंबित अर्धवेळ, सी.एच.बी. मान्यता देऊन त्यांची थकीत देयके अदा करावी. अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित शालार्थ आयडी त्वरित द्यावेत, अर्धवेळ ते पूर्णवेळ मान्यता त्वरित द्याव्यात, अंशतः अनुदानित ते अनुदानित पदांच्या मान्यता मंत्रालय पातळीवर न देता शिक्षण उपसंचालक कार्यालयात द्याव्यात,मागील ३ वर्षांपासूनचे प्रलंबित थकीत देयके त्वरित द्यावी, तालुका निहाय वेतन निश्चिती शिबिर आयोजित करून वेतन निश्चिती करावी, डी.सी.पी., एन. पी. एस. हिशोब पावत्या द्याव्यात, संच मान्यता करताना विद्यार्थी संख्येची अट शिथिल करावी ए.टी.के.टी. विद्यार्थी ग्राह्य धरावे, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांचा कार्यभार सतत तीन वर्ष कमी झाला किंवा शून्य झाला तरच त्यांना अतिरिक्त करावे व अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन समुपदेशनाने करावे. कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांना शालाबाह्य कामे देऊ नये त्याचा परिणाम अध्यापनावर होतो एचएससी बोर्ड परीक्षेचे कामकाज पक्षपाती न करता सर्वांना समान पद्धतीने द्यावे. अशा विविध मागण्यांसंदर्भात समस्या संदर्भात सकारात्मक चर्चा होऊन लवकरच प्रश्न सोडवले जातील असे आश्वासन विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे येथील श्री हरून आत्तार साहेब यांनी सांगितले या मागण्यांसाठी राज्य सचिव सुनील गाडगे,जिल्हाध्यक्ष रामराव काळे, सरचिटणीस महेश पाडेकर, महिला जिल्हाध्यक्षा रूपाली कुरुमकर, जिल्हा उपाध्यक्ष सचिन जासूद,दादासाहेब कदम, कोषाध्यक्ष गोपाळ दराडे, प्रसिद्धीप्रमुख अमोल चंदनशिवे ,तालुका अध्यक्ष संजय सुमंत शिंदे, नरेंद्र लहिरे, संजय भालेराव, नानासाहेब खराडे, रूपालीताई बोरुडे, मफीज इनामदार,कल्पना चौधरी, अकील फकीर आदींनी पाठिंबा दिला.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी