स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट
By : Polticalface Team ,18-12-2024
लिंपणगाव ( प्रतिनिधी)-देशातील अग्रमानांकित समजल्या जाणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया च्या श्रीगोंदा शाखेतील व्यवस्थापक मा श्री रावत साहेब आणि कृषी अधिकारी मा श्री मिलिंद पाटील साहेब यांनी आज येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. बँकेच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी ते आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सतिश्चंद्र सूर्यवंशी यांनी मा श्री रावत साहेब यांचे स्वागत केले. बँकेच्या कृषी विभागाचे अधिकारी मा श्री मिलिंद पाटील हे देखील आले होते त्यांचे स्वागत संस्थेचे विश्वस्त प्रा सुरेश रसाळ यांनी केले. या दोन्हीं अधिकाऱ्यांनी बँकेच्या विविध कल्याणकारी योजना सांगितल्या. मेडीकल पॉलिसी योजना, अपघात विमा, पिककर्ज, होम लोन,कार लोन या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मा प्राचार्य डॉ सूर्यवंशी यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडताना बँकेला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. बँकेने देखील सेवा सुधारणा करण्याची गरज असल्याची मागणी या वेळी केली.यावेळी उपप्राचार्य प्रा सी आर कतोरे, पर्यवेक्षक प्रा प्रवीण टकले, सर्व प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. आभार प्रा सुरेश रसाळ यांनी मानले.
वाचक क्रमांक :