प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत
By : Polticalface Team ,18-12-2024
लिंपणगाव प्रतिनिधी :
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सप्टेंबर अखेर संपलेल्या असून जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये संपलेल्या आहेत. जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्यात येत आहेत. मात्र स्पर्धा संपून मोठा कालावधी उलटला तरी अद्याप अनेक खेळांची प्रमाणपत्रे अपलोड न झाल्याने खेळाडूंना ती मिळाली नाहीत . शालेय वार्षिक क्रीडा महोत्सव व स्नेहसंमेलन चालू असून यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम व्हावा असे अनेक खेळाडू आणि पालकांची इच्छा असते. परंतु क्रीडा विभागाच्या दिरंगाईमुळे पालकांची आणि खेळाडूंची निराशा होते आहे. तसेच पालक या संदर्भात शालेय स्तरावर तक्रारी करत असल्याने क्रीडा शिक्षकांचीही डोकेदुखी वाढली आहे. शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन नियोजन प्रामाणिकपणे करणाऱ्या क्रीडा शिक्षकांस स्पर्धेनंतर मात्र अवहेलनाच सहन करावी लागत आहे .
मागील दोन वर्षापूर्वी तालुका स्पर्धेंची प्रमाणपत्रे व निधी न मिळाल्याने शालेय स्पर्धांवरती बहिष्कार घालण्यात आला होता. स्पर्धा रखडल्या होत्या. त्या वेळी जिल्हाधिकारी यांचे आश्वासन व ऑफलाईन पद्धतीने प्रमाणपत्र देण्यासाठी सत्तर हजार रुपयांच्या खर्चास मान्यता मिळून देखील दोन वर्षानंतरही प्रमाणपत्रे अद्याप मिळाली नाहीत .
शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनाचा निधीचे वेळेत वाटप होणे आवश्यक असताना अनेक फाईल्स रखडल्या आहेत. तसेच मागील वर्षीच्या स्पर्धेची काही बिले अद्यापपर्यंत अदा झालेली नाहीत . त्यामुळे ही सर्व स्पर्धा आयोजनाची बीले त्वरेने अदा करावीत या बाबतचे निवेदन जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलणकर यांना देऊन चर्चा करण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार शितोळे यांनी दिली .
या वेळी राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरंगे उपस्थित होते . राज्य क्रीडा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब शिंदे व प्राचार्य शिरीष टेकाडे यांच्या नेतृत्वाखाली नगर तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष महेंद्र हिंगे, पारनेर तालुकाध्यक्ष बापूराव होळकर, बबन लांडगे, पंकज जगताप, धन्यकुमार हराळ, कैलास मोकळे, अंकुश बर्डे, लष्करे सर, चंद्रकांत सरोदे यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी