आई वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ ज्ञान आणि अन्नदान करा ह भ प अनिल महाराज कवडे
By : Polticalface Team ,23-12-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी)- आई-वडिलांच्या मृत्यूनंतर प्रत्येकाने आवश्य ज्ञान आणि अन्नदान करावे; निश्चितपणे मृत आत्म्यास मोक्ष मिळतो असे भावनिक आवाहन ह भ प अनिल महाराज कवडे यांनी आयोजित प्रवचन सोहळ्यात व्यक्त केले.
मुंढेकरवाडी तालुका श्रीगोंदा येथील ज्येष्ठ व्यक्तिमत्व भालेराव सर्जेराव कुरुमकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त ह भ प अनिल महाराज कवडे यांची प्रवचन सेवा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थित भाविकां समोर बोलताना कवडे महाराज पुढे म्हणाले की; कसलाही अतिप्रसंग आला तर संत माघारी घेत नव्हते. यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये भक्तीचे मोठे सामर्थ्य होते. सतत परमेश्वराचे नामस्मरण चिंतन वृद्ध आई-वडिलांची सेवा केल्याने परात्मा प्रत्येकाच्या सुखदुःखात निश्चितपणे धावून येतो. असे सांगून कवडे महाराज आणखी पुढे म्हणाले की; बारा वर्षे सतत खरे बोलले तर त्याला चांगले फळ मिळते हे संत महात्म्यांचे तत्व होते. संत महात्मे हे काळाच्या ओघातून प्रत्येकाला सोडवत असतात. त्यासाठी लवकर परमार्थिक जीवनाकडे पाहून सतकार्य करण्याची आवश्यकता आहे. बापाकडे कृपा आहे. तर आईकडे प्रखर माया असते. वर्ष श्रद्धातून घरातील कुटुंबियांना शांती व समाधानाचा मार्ग मिळतो. कृपावृष्टी मिळते; बाप म्हणजे घराचे अस्तित्व असते; आणि आई हे संस्काराचे प्रतीक असते. त्यासाठी एकत्रितपणे कुटुंबामध्ये कलह वाढवून देऊ नये त्यांचे संस्कार अंगी करावेत. असे सांगून कवडे महाराज आणखी पुढे म्हणाले की; मुला मुलींच्या संस्कारातून मुलाच्या भावी आयुष्यासाठी बाप पोटाला चिमटा घेऊन प्रत्येकाचे पालन पोषण करत असतो तर आई ही घराला घरपण मिळवन देते. त्यासाठी आई-वडील असेपर्यंत तीर्थक्षेत्राला जाण्याची गरज नाही. आई वडील हेच आपले तीर्थक्षेत्र व दैवत असते. त्यासाठी वर्धापकाळात आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना अंतर देऊ नका. संपत्तीच्या वाटाघाटीमध्ये आई-वडिलांची अलीकडे मोठी वाताहात होताना दिसते. तिरस्कार केला जातो. हे भयानक चित्र सध्या प्रत्येक समाजात दिसून येत आहे असे सांगून कवडे महाराज आणखी पुढे म्हणाले की; आई वडील हे भगवंता समान समजून त्यांची प्रामाणिकपणे सेवा करा; असे सांगून कवडे महाराज पुढे म्हणतात की; आताच्या युगामध्ये आई-वडिलांचा तिरस्कार वाढला जातो केवळ पत्नीच्या हट्टा पायी. आई-वडिलांना थेट वृद्धापआश्रमामध्ये पाठवले जाते. हे भयानक चित्र सध्या सर्वत्र निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. ही चिंताजनक बाब असल्याचे कवडे महाराज यांनी यावेळी आवर्जून सांगितले. कवडे महाराज यांनी संत ज्ञानेश्वर मुक्ताबाई संत तुकाराम एकनाथ महाराज या संत महात्म्याची उदाहरण देत उपस्थित ग्रामस्थ व महिलांना मंत्रमुक्त केले.
या सोहळ्यास लिंपणगाव मुंढेकरवाडी शेंडेवाडी येथील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
वाचक क्रमांक :