मुंबई येथील पस्तीस जणांचा जीव वाचविणाऱ्या आरिफ मोहम्मद यांचा राष्ट्रपती पदक देऊन गौरव करण्यात यावा,,,,, करमाळा येथील भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम फाउंडेशन यांनी केली मागणी
By : Polticalface Team ,23-12-2024
करमाळा प्रतिनिधी
मुंबई येथील पस्तीस जणांचा जीव वाचविणा-या देवदुत आरीफ मोहंमद बामणे याचा महाराष्ट्र सरकारने यथोचित सन्मान करावा अशी मागणी भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन ची आहे*
मुंबईतील गेट ऑफ इंडिया वरून एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल फेरीबोटीला एक सुसाड स्पीड बोटीने धडक दिली यामध्ये तेरा जणांचा मृत्यू बुडून झाला त्यामध्ये तीन नौदलाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे या अपघातातुन 101 लोकांचा जीव वाचवण्यात आला आहे अपघात घडला त्यावेळी काही मिनिटांतच आस पास च्या बोटी मदतीसाठी आल्या त्यामुळे अनेकांचा जीव वाचवणे शक्य झाले
वेळेत मदत मिळाली नसती तर कदाचित मृतांचा आकडा वाढला असता अशा वेळी बचाव दल पोहचले सुद्धा नव्हते अशा वेळी देवदुत म्हणून पहिल्या अर्ध्या तासात आरीफ मोहंमद बामणे नावाच्या पायलट बोटीवरील एका व्यक्तीने तब्बल पस्तीस जणांचा जीव वाचविला आहे अशा धाडसी कार्य करणाऱ्या व्यक्तीला राष्ट्रपती पदकाने गौरव करुन महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री जनेतेचे देवा भाऊंनी मुस्लीम समाजातील आरीफ मोहंमद बामणे याचा गौरव करावा अशी मागणी भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन करमाळा व सकल मुस्लीम समाज करमाळा यांच्या वतीने करण्यात येत आहे .
वाचक क्रमांक :