यवत खुटबाव मार्गांवर अचानक पेटली कार. मोबाईल सह १ लाख ७० हजाराचे नुकसान. यवत पोलीस स्टेशन येथे जळीत नोंद दाखल
By : Polticalface Team ,24-12-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता २४ डिसेंबर २०२४ यवत पोलीस स्टेशन हद्दीतील खुटबाव वरुन यवत बाजुकडे येत असताना अचानक कार गाडीला आग लागली हि घटना दि २३ रोजी रात्री घडली असल्याची माहिती यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली.
या बाबत अधिक माहिती अशी की खबर देणार - सुनिल शामराव बागडे वय 54 वर्षे रा. खाजगी नोकरी रा. यवत स्टेशन रोड ता. दौंड, जि.पुणे. यवत पोलीस स्टेशन डायरी जळीत नोंद करण्यात आली असून जळीत वाहन - रेनॉल्ट कंपनीची क्विड आर एक्स टी मॉडेलची कार नं. एम.एच. 42 ए.एच. 3508 व नोकिया कंपनीचा मोबाईल असे एकूण 1 लाख 70 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जळीत नोंद करण्यात आली आहे सदर घटना
दि.23/12/2024 रोजी रात्री 08.15 वा. सुमा. मौजे. यवत ता. दौंड गावचे हद्दीत कांतीलाल शहा यांचे शेतजमिनचे जवळील रोड वरून जात असताना घडली
हकिकत- वर नमुद केले तारखेस वेळी व ठिकाणी यातील खबर देणार खबर दिली ते व त्यांची पत्नी जयश्री असे खुटबाट वरुन यवत येथे येत असताना यवत हद्दीतील कांतीलाल शहा यांचे शेतजमिनचे जवळून रोड वरून जात असताना त्यांचे कार गाडीत जळाले सारखा वास आलेने. त्यांनी कार गाडी रोडचे बाजुला उभी करून चालक व त्यांची पत्नी सौ.जयश्री हे गाडीचे खाली उतरून गाडीची पाहणी करित असताना अचानक संपुर्ण गाडीने पेट घेतला. या वेळी गाडीमध्ये सौ.जयश्री हिचा नोकिया कंपनीचा मोबाईल व रेनॉल्ट कंपनीची क्विड आर एक्स टी नं.एम.एच.42 ए.एच. 3508 हि पुर्णपणे जळुन अंदाजे 1,70,000/- हजारांचे नुकसान झाले असल्याचे यवत पोलीस स्टेशन येथे वगैरे खबरी वरून जळीत नोंद दाखल अंमलदार पो हवा चोरमले. पोलीस हवालदार खैरे पुढील तपास करीत आहेत
वाचक क्रमांक :