समाज कल्याण विभाग अहिल्यानगर अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न.

By : Polticalface Team ,25-12-2024

समाज कल्याण विभाग अहिल्यानगर अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न. लिंपणगाव (प्रतिनिधी)अहिल्यानगर येथील मा. सहाय्यक आयुक्त कार्यालय, समाज कल्याण अंतर्गत येणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन दि. 21 व 22 डिसेंबर रोजी मुलींची शासकीय निवासी शाळा मांडवगण येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. दि. 21 डिसेंबर शनिवारी रोजी क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन मा. श्री. प्रवीण कोरगंटीवार साहेब (सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अहिल्यानगर) यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी मा. श्री देविदास कोकाटे साहेब (समाज कल्याण अधिकारी जि प अहिल्यानगर) यांची प्रमुख उपस्थिती लाभली .. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मशाल पेटवून खेळाडूंची शपथ घेण्यात आली व साहेबांच्या हस्ते फीत कापून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. आपल्या शुभेच्छा देणाऱ्या भाषणात श्री. कोरगंटीवार साहेबांनी ध्यान व खेळाचे महत्व समजून सांगितले..सर्व अधिकारी व कर्मचारी खेळाडूंनी हिरीरीने सहभाग घेऊन खेळाडू वृत्तीचे प्रदर्शन घडवले. यावेळी 100 मीटर, 200 मीटर रनिंग, बॅडमिंटन, बुद्धिबळ, क्रिकेट, व्हॉलीबॉल, रस्सीखेच इत्यादी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांना समाज कल्याण अधिकारी मा. श्री .देविदास कोकाटे साहेब यांच्या हस्ते मेडल व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. विद्या पारोदे मॅडम, सहाय्यक शिक्षक श्री शेळके सर, श्री बोरूडे सर, श्रीम. जाधव मॅडम, श्रीमती पटेकर मॅडम, श्रीमती दळे मॅडम व इतर कर्मचारी वर्ग तसेच विद्यार्थीनींनी महत्वाचे योगदान दिले आणि आणि स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडल्या.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी