छत्रपती शिवाजी महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा यावर कार्यशाळा संपन्न.
By : Polticalface Team ,04-01-2025
लिंपणगाव ( प्रतिनिधी). दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी श्रीगोंदा येथेल छ्त्रपती शिवाजी महाविद्यालयात वाचन कौशल्य कार्यशाळा व सामूहिक वाचन हा उपक्रम राबवण्यात आला. शासनाच्या परिपत्रकानुसार यावर्षी १ ते १५ जानेवारी या कालावधीत वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अभिनव उपक्रमांतर्गत वाचन संस्कृती जोपासण्यासाठी महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यासाठी महाविद्यालयीन समिती गठीत करण्यात आली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जी. सुर्यवंशी यांनी दिली.
सुरुवातीला प्रास्ताविक करताना हिंदी विभाग प्रमुख प्रा. सुरेश रसाळ यांनी आजची तरुण पिढी सोशल मीडियामुळे वाचन संस्कृती पासून दूर जात असल्याची खंत व्यक्त केली. तरुणाईत वाचनाची गोडी निर्माण व्हावी, वाचकाना प्रेरणा मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाला वेगवेगळे उपक्रम राबवावी लागत आहेत. त्याचाच हा भाग म्हणून आजचा हा उपक्रम राबविण्यात येत आहे असे सांगितले.
कार्यशाळेस संबोधित करताना वाचकानी काय आणि कसे वाचावे. वाचण्याच्या सवयी आणि पद्धती याविषयी प्राध्यापिका डॉ. सविता लोखंडे यांनी मौलिक असे मार्गदर्शन केले. अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी यांनी वाचनाचे महत्त्व पटवून देताना सोशल मीडिया ने वाचनाचा वेळ घेतल्यामुळे वाचन संस्कृतीवर प्रभाव पडल्याचे विशद केले. वाचनाविषयी विद्यार्थ्यांना सल्ला देताना त्यांनी म्हटलेकी, स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी तरुण पिढीने वाचन आणि अभ्यासाला प्राधान्य दिलं पाहिजे. उद्याच्या काळात तुम्ही वाचाल तरच वाचाल.
त्यानंतर महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापक तर सेवक आणि विद्यार्थ्यां विद्यार्थिनींनी एक तास सामूहिक वाचन केले. या कार्यक्रमाचे सुंदर असे संयोजन आणि सूत्रसंचालन प्राध्यापक मिलिंद बेडसे यांनी केले. तर आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे प्रभारी ग्रंथपाल ईश्वर कणसे यांनी केले.
कार्यक्रमास विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ मुकुंद भोस, रासेयो अधिकारी डॉ. मनोहर सूर्यवंशी, प्रा. सुहास क्षीरसागर, प्रा. खोमणे सर, डॉ. धर्मनाथ काकडे, ग्रंथालय विभागाचे अनिल पवार सर, श्री अनिल बोरुडे, श्री सोमनाथ सोनवणे सह विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत महाविद्यालयात वाचन कौशल्य कार्यशाळा व सामूहिक वाचन या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्र दादा नागवडे, उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. अनुराधाताई नागवडे , निरीक्षक सचिनराव लगड, सर्व विश्वस्त, दीपकशेठ नागवडे आदींनी शुभेच्छा दिल्या.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी