By : Polticalface Team ,05-01-2025
लिंपणगाव ( प्रतिनिधी )सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचा सन 2024 -25 या चालू गळीत हंगामाचा गाळपास आलेल्या उसाचा पहिला हप्ता 2800 रुपये प्र. मे. टनाप्रमाणे येत्या दोन-तीन दिवसात सभासद शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांनी दिली.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नागवडे यांनी पुढे म्हटले आहे की, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना ऊस भावामध्ये आतापर्यंत कधीही मागे राहिलेला नाही. सातत्याने चांगला ऊस भाव देऊन सभासद व ऊस उत्पादक शेतकरी यांच्या हिताला प्राधान्य दिलेले आहे. सभासद शेतकऱ्यांना मागील 2023 -24 मध्ये दिलेल्या शब्दांनुसार मागील वर्षीची एफ.आर. पी. सह 2900 प्र.मे. टन याप्रमाणे ऊस पेमेंट अदा करून सभासद शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली आहे.
त्यानुसार चालू 2024 - 25 या गळित हंगामास येणाऱ्या उसाला पहिला हप्ता रुपये 2800 प्र. मे. टनाप्रमाणे देण्यात येणार आहे. नागवडे कारखान्याने सातत्याने दिलेल्या शब्दाप्रमाणे चांगला ऊस दर व इतर पूर्तता केलेली असून सभासद व ऊस उत्पादकांचा विश्वास संपादन केलेला आहे. जिल्ह्यात इतर कारखान्यांच्या तुलनेत नागवडे कारखाना ऊस भावात मागे राहणार नाही असे नागवडे म्हणाले.
तरी सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांनी ऊस भावा बाबत कुठल्याही प्रकारची शंका मनामध्ये न ठेवता नागवडे सहकारी साखर कारखान्यास जास्तीत जास्त ऊस देऊन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे, व्हा. चेअरमन बाबासाहेब भोस व संचालक मंडळ सदस्य यांनी केले आहे.
वाचक क्रमांक :