By : Polticalface Team ,06-01-2025
लिंपणगाव ( प्रतिनिधी )साई सेवा बहुउद्देशीय सेवा प्रतिष्ठानचे हंगेश्वर पब्लिक स्कूल आणि के.पी जाधव हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चिंभळे येथे पंधरावे वार्षिक स्नेहसंमेलन व साई भूषण पुरस्कार २०२४ चे वितरण हे अतिशय उत्साहात पार पडले
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नवनाथ जी लाड त्याचबरोबर श्रीगोंदा पंचायत समितीची शिक्षण विस्तार अधिकारी निळकंठ बोरुडे साहेब डॉ. राजेंद्र प्रसाद विद्यालयाचे मुख्याध्यापक हिरवे सर चिंभळे गावचे सरपंच श्री संजय सावंत हे होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला व त्यांना विविध पारितोषिक देण्यात आले त्याचबरोबर संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रातील प्रेरणादायी काम करणाऱ्या सत्कारमूर्तींना साईभूषण पुरस्कार २०२४ ने गौरवण्यात आले यामध्ये सहकारिता क्षेत्रातून बेलवंडी व्यापारी ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे चेअरमन श्री उत्तम जी डाके पत्रकारिता क्षेत्रातून श्री अमोलजी गव्हाणे तर कृषी क्षेत्रातून माठ गावचे राजेंद्र घेगडे यांना साईभूषण पुरस्कार २०२४ ने गौरविण्यात आले तर आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेमध्ये मध्ये देशाची प्रतिनिधित्व करणारे कु. धनश्री हनुमंत फंड हिला क्रीडा क्षेत्रातून हिरकणी पुरस्कार २०२४ने गौरविण्यात आले
पारगावचा आरव मनोज वडवकर या मुलाच्या श्रवण यंत्र खरेदी करण्यासाठी संस्थेची वतीने २१००० रुपयांचा धनादेश संस्थेचे अध्यक्ष डॉ. सचिन जाधव आणि सचिव डॉ. शुभांगी जाधव यांच्या हस्ते वडवकर कुटुंबियांना देण्यात येऊन आर्थिक मदत केली.
सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी अनेक समाज प्रबोधनाचे काम केले शेतकरी गीत कोळी नृत्य, देशभक्ती गीते असे अनेक नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य जालिंदर मोहिते सर यांनी केले तर सूत्रसंचालन संतो संतोषीनी लबडे मॅडम आणि आशिष कराळे सर यांनी केले संदीप देवकर सर यांनी आभार मानले प्राध्यापक बडदे सर, घाडगे सर कलगुंडे मॅडम, पवार मॅडम, नलवडे मॅडम यांनी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले