By : Polticalface Team ,09-01-2025
लिंपणगाव( प्रतिनिधी) दि.८ श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, बहि:शाल शिक्षण मंडळ व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब जयकर ३ दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली .
सदर द्वितीय व्याख्यानमालेचे प्रास्ताविक व व्याख्यात्याचा परिचय प्रा.डॉ.धर्मनाथ काकडे यांनी केला. त्यांनी कुलगुरू डॉ.बाबासाहेब जयकर यांच्या नाव असलेली व्याख्यानमाला चालू करण्याचा उद्देश सांगितला. सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी वाचन संस्कृती निर्माण केली. वाचन संस्कृतीतून विद्यार्थी वाचक व्हावा यासाठी ही व्याख्यानमाला महत्वाची असल्याचे प्रतिपादन केले.
या व्याख्यानमालेचे व्याख्याते सुरेंद्र गुजराथी हे होते. त्यांनी शंकर पाटील लिखित धिंड कथेचा एकपात्री प्रयोग सादर केला. या कथेतील प्रसंगाचा उलघडा करत पाटील, सरपंच,राऊ या दारू या पात्राची भूमिका व वास्तव समाजचित्रण उजागर केले. बहूपात्रिय व्यक्तिरेखा सादर करत एकपात्री अभिनयातून एकच प्याला, नटसम्राट आणि धिंड कथेतील प्रसंग बोलका केला.
या व्याख्यानमालेचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. सतीषचंद्र सूर्यवंशी यांनी भूषविले. त्यांनी जगण्यासाठीच्या जिवंतपणाची मराठी कथा व भाषा लाखमोलाची आहे. मराठी संस्कृतीची जपण्यासाठी मराठी भाषेचा दर्जा वाढवाचे काम कथा करते.त्यासाठीच्या प्रामाणिक प्रयत्नातून मराठी भाषा कळजापर्यत पहोचायला हवी असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.सचिन धेंडे यांनी केले तर आभार प्रा. डॉ.संदीप अभंग यांनी मानले.या व्याख्यानमालेसाठी
संस्था विश्वस्त प्रा. सुरेश रसाळ, डॉ.मन्मथ लोहगावकर, डॉ.संदीप कदम, डॉ.मनोहर सुर्यवंशी, प्रा.मिलिंद बेडसे,डॉ.संदीप अभंग, डॉ.राजेश बाराते,डॉ.प्रवीण पिसे, प्रा.राणसिंग मॅडम, प्रा.पाचपुते मॅडम, मनिषा लोहगावकर मॅडम, पिराजी मोरे व मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी व कर्मचारी उपस्थित होते.