व्यंकनाथ विद्यालयाची विद्यार्थिनी शिवांजली कापसे हिचा तालुकास्तरीय.विज्ञान प्रदर्शन व वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक
By : Polticalface Team ,09-01-2025
लिंपणगाव (प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्री व्यंकनाथ विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी शिवांजली कापसे हिने लहान गट इयत्ता सहावी ते आठवी गटामध्ये विज्ञान प्रदर्शन व वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. शिवांजलीच्या या यशाने श्री व्यंकनाथ विद्यालयाची मान आणखी उंचावली गेली आहे.
पंचायत समिती श्रीगोंदा व श्रीगोंदा तालुका विज्ञान गणित अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कोळगाव येथे कोळाई देवी विद्यालयात सन 2024--25 या शैक्षणिक वर्षातील 52 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर विज्ञान गणित प्रदर्शन सात ते नऊ जानेवारी या तीन दिवसीय कालावधीत आयोजित करण्यात आले होते या तालुकास्तरीय विज्ञान गणित प्रदर्शनाचा 9 जानेवारी रोजी समारोप करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी आमदार राहुल जगताप हे होते.
या समारोप कार्यक्रम प्रसंगी गटशिक्षणाधिकारी सत्यजित मच्छिंद्र; विस्तार अधिकारी निळकंठ बोरुडे; सिताराम भुजबळ; भाऊसाहेब शिर्के; सुनिता वाजे; केंद्रप्रमुख महादू उधार; नागवडे कारखान्याचे संचालक रमजान हवालदार सर; लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम लगड; दिनकरराव पंदरकर; स्कूल कमिटीचे अध्यक्ष अमित लगड; एम आर लगड सर; नितीन नलगे; शंकर बागायतदार यांच्यासह अन्नदाते नितीन दुबल विज्ञान अध्यापक संघटनेचे अध्यक्ष देविदास खेडकर गणित अध्यापक संघटनेचे राजेंद्र बारगजे आदी यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन सविता कारले मॅडम यांनी केले आभार सरपंच पुरुषोत्तम लगड यांनी मानले.
श्री व्यंकनाथ विद्यालयाची विद्यार्थिनींनी कुमारी शिवांजली कापसे हिने विज्ञान व वकृत्व स्पर्धा लहान गटामध्ये धाडसाने सहभाग घेऊन प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे; उपाध्यक्ष बाबासाहेब भोस; संस्थेचे निरीक्षक सचिनराव लगड; स्कूल कमिटीचे अध्यक्ष डी आर काकडे; यांच्यासह स्कूल कमिटीचे सर्व सदस्य; प्राचार्य आनंदा पुराने सर आदींनी कुमारी शिवांजली कापसे हिचे भरभरून कौतुक करत अभिनंदन केले आहे.
वाचक क्रमांक :