अखेर लिंपणगाव ते श्रीगोंदा रेल्वे स्टेशन रस्त्याचे डांबरीकरण सुरू वाहनचालक व प्रवाशांना मोठा दिलासा
By : Polticalface Team ,14-01-2025
लिंपणगाव( प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव ते श्रीगोंदा रेल्वे स्टेशन हा दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जाणाऱ्या रस्त्याचे दोन दिवसापासून डांबरीकरण सुरू झाल्याने वाहनचलक प्रवासी व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान लिंपणगाव ते श्रीगोंदा रेल्वे स्टेशन या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे गेल्या सहा महिन्यापूर्वी खडीकरण करण्यात आले. परंतु तो रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत होता. या प्रश्नासंदर्भात ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्याशी चर्चा करून प्रसिद्धीच्या माध्यमातून या रस्त्याच्या प्रश्नसंदर्भात वेळोवेळी वाचा फोडली. वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर गेल्या दोन दिवसापासून या रस्त्याच्या डांबरीकरणास प्रारंभ झाल्याने प्रवासी वाहनचालक व शेतकऱ्यांनी पत्रकार कुरुमकर यांना धन्यवाद दिले आहेत. दरम्यान पत्रकार कुरुमकर यांनी श्रीगोंदा तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांना प्रसिद्धीच्या माध्यमातून सडेतोड लिखाण करून प्रशासन व संबंधित ठेकेदारांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार अनेक प्रलंबित रस्त्याच्या कामास उत्तम प्रकारे गती मिळाल्याचे माजी सैनिक प्रकाश चव्हाण सांगितले.
त्यामध्ये श्रीगोंदा रेल्वे स्टेशन हे लिंपणगाव; मुंढेकरवाडी; होलेवाडी बाबरवाडी; पवारवाडी; शेंडेवाडी; आनंदवाडी; चिखलठाणवाडी इत्यादी गाव व वाड्यातील ग्रामस्थ दूरचा प्रवास करण्यासाठी श्रीगोंदा रेल्वे स्टेशन कडे याच रस्त्यावरून ये -जा करताना दिसत होते. परंतु या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्याची मोठी दुरावस्था निर्माण झाली होती. या नादुरुस्त रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात पत्रकार कुरुमकर यांनी वेळोवेळी प्रसिद्धीच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानुसार गेल्या सहा महिन्यापूर्वीच या रस्त्याला मंजुरी मिळाली. परंतु फक्त या रस्त्याचे खडीकरण करण्यात आले होते. ती खडी देखील उदसली गेली होती. त्यामुळे या रस्त्याची पुन्हा जैसे थे अवस्था निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत होते. व डांबरीकरण देखील रखडले गेले होते. या प्रलंबित रस्त्याच्या प्रश्न संदर्भात पत्रकार कुरुमकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री होके साहेब व संबंधित ठेकेदार यांच्याशी सकारात्मक चर्चा केली. त्यानुसार लिंपणगाव ते श्रीगोंदा रेल्वे स्टेशन या रस्त्याचे उत्तम प्रकारे डांबरीकरण सुरू झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
* मुंढेकरवाडीच्या रस्ता दुरुस्ती कामाचा दर्जा सुधारा
दरम्यान मुंढेकरवाडीच्या कुरुमकर मळा ते उंबर फाटा या रस्त्याचे डांबरीकरण सुरू आहे; परंतु तेथील डांबरीकरणाचा दर्जा खालावला जातो आहे. तशा तक्रारी प्रवासी वाहन चालक व ग्रामस्थांनी केल्या आहेत. या प्रश्ना संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कामाचा दर्जा सुधारण्याची मागणी मुंढेकरवाडीचे सामाजिक कार्यकर्ते सोन्याबापु कुरुमकर; मेजर प्रकाश चव्हाण व ग्रामपंचायतचे माजी सदस्य नवनाथ रंधवे यांनी केली आहे. दरम्यान मुंढेकर वाडी ते लिंपणगाव मार्गे श्रीगोंदा रेल्वे स्टेशन कडे या रस्त्याची दुरुस्ती सुरू आहे मात्र मध्यंतरी केलेले खडीकरण पुन्हा उदसले जात असून डांबरीकरण केलेले रस्त्याचे काम पाठीमागे लगेच उदसले जात आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांना सूचना द्याव्यात अशी देखील मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वाचक क्रमांक :