छत्रपती महाविद्यालयाचा राज्यस्तरीय करिअर संसद अधिवेशनात उत्स्फूर्त सहभाग, महाराष्ट्र राज्यातील विविध कॉलेजचे ८०० विद्यार्थी आणि २०० समन्वयक व प्राचार्य यांचा सहभाग.

By : Polticalface Team ,15-01-2025

छत्रपती महाविद्यालयाचा राज्यस्तरीय करिअर संसद अधिवेशनात उत्स्फूर्त सहभाग, महाराष्ट्र राज्यातील विविध कॉलेजचे ८०० विद्यार्थी आणि २०० समन्वयक व प्राचार्य यांचा सहभाग.

लिंपणगाव (प्रतिनिधी )महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा उपक्रम अंतर्गत दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन बारामती येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालय येथे दिनांक १२ जानेवारी ते १३ जानेवारी २०२५ रोजी संपन्न झाले.

या अधिवेशन करता श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयामधून अहिल्यानगर जिल्ह्याचे प्राचार्य प्रवर्तक व कॉलेजचे प्राचार्य डॉ.सतीशचंद्र सूर्यवंशी, करिअर कट्टा  समन्वयक प्रा.विलास सुद्रिक आणि विद्यार्थ्यांमधून करिअर संसदचे ८ पदाधिकारी यांनी सहभाग नोंदवला.

या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी छत्रपती शिवाजी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र (दादा) नागवडे, उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, सौ.अनुराधाताई नागवडे, निरीक्षक सचिनराव लगड व सर्व विश्वस्त यांनी शुभेच्छा दिल्या.


या अधिवेशनाचे उद्घाटन बारामती ॲग्रो ट्रस्ट च्या विश्वस्त सौ. सुनंदाताई राजेंद्र पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.

विविध क्षेत्रातील नामांकित मान्यवरांनी पहिल्या दिवशी मार्गदर्शन केले यामध्ये उद्योजक प्रदीप लोखंडे, भारत सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाचे उपसचिव गौरव जोशी, भारत सरकारच्या पी.एस.यु. अंतर्गत विविध सरकारी कंपन्या मधील रिक्त जागांसाठी परीक्षा घेणारे विभागप्रमुख उत्तम गायकवाड, माजी सहाय्यक पोलीस उपायुक्त ॲड. धनराज वंजारी, पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त राजीव नंदकर यांचा समावेश होता.

रात्री जेवणानंतर मुक्त चर्चेमध्ये आवाजाची काळजी कशी घ्यावी या विषयावर व्हॉईस थेरपिस्ट डॉ.सोनाली लोहार यांनी मार्गदर्शन केले तसेच प्लेसमेंट करता करिअर संधी आणि मुलाखती करता कोणती कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत याबाबत चित्रा उबाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या मान्यवरांच्या अनुभवांमुळे स्वप्नं प्रत्यक्षात कशी उतरवायची याची प्रेरणा मिळाली. करिअरचे पर्याय, उद्योजकता आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने यशस्वी होण्याच्या संधींबद्दल सखोल चर्चा झाली.

दुसऱ्या दिवशी सकाळी बारामती येथील कृषी महाविद्यालयातील कृषी प्रदर्शन मध्ये भेट आयोजित करण्यात आली. ए. आय.तंत्रज्ञानात शेती करता कसे फायद्याचे आहे याचे प्रात्यक्षिक सादर केले तसेच विविध छोट्या उद्योगांची माहिती मिळाली.यामध्ये कुकुट पालन, शेळी पालन,दुग्धव्यवसाय तसेच जास्त उत्पादन देणाऱ्या विविध प्रजाती पहावयास मिळाल्या.तसेच अमेरिका येथील  गर्जे मराठी चे संस्थापक आनंद गानु यांनी तेथील व्यवसायाबद्दल माहिती दिली.

करिअर कट्टा चे अध्यक्ष यशवंत शितोळे सर आणि त्यांच्या टीमने विद्यार्थ्यांची मोफत उत्तम राहण्याची व जेवणाची उत्कृष्ठ सोय केली.

अधिवेशनात सहभागी होणे हा अत्यंत समृद्ध आणि प्रेरणादायी अनुभव ठरला. एका जागेवर जास्त वेळ बसून ज्ञान अर्जित करणे खूप महत्वाचे आहे. या अधिवेशनाने शैक्षणिक व व्यावसायिक जगतातील अनेक गोष्टी समजावून दिल्या तसेच विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य दिशादर्शन दिले. या दोन दिवसांत मिळालेल्या शिकवणीमुळे करिअरच्या दृष्टीने खूप सकारात्मक बदल घडू शकतो, याची खात्री पटली. करिअर कट्टा अधिवेशनाने केवळ ज्ञानच दिले नाही तर स्वतःवर विश्वास ठेवण्याची प्रेरणाही दिली. हा अनुभव नक्कीच आयुष्यभर लक्षात राहील अशी प्रतिक्रिया छत्रपती कॉलेजमधील सहभागी विद्यार्थ्यांनी दिली.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष