छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मानवतेचा व समानतेचा- प्रा.अफसर शेख
By : Polticalface Team ,18-01-2025
लिंपणगाव (प्रतिनिधी) लोकनेते, मा.आ.शिवाजीराव नारायणराव नागवडे (बापु) यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त महाविद्यालयात व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. द्वितीय पुष्प गुंफण्याकरता शिवव्याख्याते प्रा.अफसर शेख उपस्थित होते.
प्राचार्य डॉ.सतीशचंद्र सुर्यवंशी यांनी शिवव्याख्याते प्रा.अफसर शेख यांचा सन्मान केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुरेश रसाळ यांनी केले तर पाहुण्यांची ओळख महाविद्यालयाचे उपप्राचार्य चंद्रभान कातोरे यांनी करून दिली.
शिवव्याख्याते प्रा.अफसर शेख यांनी “श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा महाराष्ट्र” या विषयावर व्याख्यान दिले.त्यांनी महाराजांचे संस्कार आपण विसरत चाललो आहोत. महाराजांचे ६ कार्य म्हणजे राजेंची दूरदृष्टी, शिस्त, शास्त्र, शस्त्र, संघटन आणि प्रशासन महत्वाचे आहेत. इतिहासात एकमेव राजा पाठीवर ढाल आणि हातात तलवार असणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी होय.शिवाजी महाराजांचे विचार आज लाख मोलाचे आहेत.आयुष्यात जिजाऊ नाही होता आले तरी चालेल पण एक तरी शिव चरित्राचा गुणधर्म आपल्या मुलांमध्ये उतरवा. तुमच्या आयुष्यात महाराज नाही होता आले तर तुमच्यामुळे आई वडिलांच्या डोळ्यात पाणी येणार नाही याची काळजी घ्या अशी मुलांकडून आशा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नागवडे कारखान्याचे संचालक लक्ष्मणराव रायकर यांनी भूषविले.त्यांनी बापू स्वभावाने व आचरणाने आदरणीय होते असे सांगितले.
सूत्रसंचालन प्रा.योगेश शेलार व प्रा.प्रवीण नागवडे यांनी केले.आभार प्रदर्शन डॉ.प्रमोद परदेशी यांनी केले. या कार्यक्रमानंतर पारंपरिक पोषाख सादरीकरण झाले. यानंतर समाज परिवर्तन हा एकांकिकेचा विषय घेऊन अत्यंत सुंदर एकांकिका विद्यार्थ्यांनी सादर केल्या.तसेच बॉलिवूड पोषाखाचे सादरीकरण बॉलिवूड पोषाख सादरीकरण झाले.
या कार्यक्रमासाठी भाऊसाहेब नेटके,मुकुंद सोनटक्के, डॉ.धर्मनाथ काकडे,पोपटराव बोरुडे,निशिकांत निंभोरे,विजय मुथा,बाळासाहेब काकडे,समिरानजी नागवडे,आमीन शेख,हरिदास खेतमाळीस,बाळासाहेब भोर,राजेंद्र हिरवे,दत्ता जगताप,श्रीरंग साळवे उपस्थित होते तसेच मोठ्या प्रमाणावर नागरिक, प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी