काष्टी लिंपणगाव श्रीगोंदा या राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताची मालिका थांबता थांबेना ?

By : Polticalface Team ,23-01-2025

काष्टी लिंपणगाव श्रीगोंदा या राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताची मालिका थांबता थांबेना ? लिंपणगाव( प्रतिनिधी) काष्टी- लिंपणगाव- श्रीगोंदा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 -डी या राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताची मालिका थांबता थांबेना अपघाताची मालिका रोखण्यासाठी केंद्रीय रस्ता वाहतूक विभागाकडून तातडीने काष्टी ते श्रीगोंदा पर्यंत रस्त्याच्या मध्यभागी डिव्हायडर तातडीने बसविण्यात यावीत अशी मागणी प्रवासी वाहन चालक यांनी केले आहे. दरम्यान मागील महिन्यामध्ये लिंपणगाव येथील अंबालिका कारखान्याचे कर्मचारी संदीप कोयते यांचा लिंपणगाव येथे 548 राष्ट्रीय महामार्गावर अपघात होऊन जागेवरच मृत्युमुखी पावले. आता पुन्हा ज्या ठिकाणी संदीप कोयते यांचा मृत्यू झाला त्याच ठिकाणी परिवहन महामंडळाची नादुरुस्त बसला पाठीमागून धडकून नवनाथ अशोक साबळे वय 39 वर्ष या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने 548-डी हा राष्ट्रीय महामार्ग सध्या मृत्यूच्या विळख्यात पडल्याचे दिसून येत आहे. दरम्यान युवक नवनाथ साबळे यांचा मोबाईल शॉपी च व्यवसाय होता ते नेहमीप्रमाणे आपले काम उरकल्यानंतर मांडवगण फराटा कडून काष्टी मार्गे लिंपणगावकडून श्रीगोंदाकडे दुचाकी वरून मार्गस्थ होत असताना परिवहन महामंडळाची नादुरुस्त बस लिंपणगाव नजीक थांबली होती. त्यां नादुरुस्त बसचे काम करण्यासाठी दुसरी बस पाठीमागे उभी केली होती. रात्री साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान दुचाकीस्वार श्री नवनाथ साबळे यांना थांबलेल्या बसचा अंदाज न आल्याने ते थेट उभ्या असलेल्या बसवर पाठीमागून जाऊन धडकले. त्या गंभीर अपघातात नवनाथ साबळे यांना जबर मार लागल्याने ते जागेवरच बेशुद्ध अवस्थेत तब्बल एक तास रस्त्यावरच पडून होते. सोशल मीडियावर सदर अपघाताचे वृत्त तरुणांना समजल्यानंतर लिंपणगावच्या तरुणांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तरुणांनी 108 नंबरच्या गाडीला फोन लावल्यानंतर गाडी काही वेळा नंतर घटनास्थळी आली. त्या अपघातग्रस्त तरुणाला तातडीने श्रीगोंदा येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले परंतु उपचारापूर्वीच नवनाथ साबळे यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वास्तविक पाहता संबंधित बस चालकाने रस्त्याच्या कडेला बस थांबवायला पाहिजे होती परंतु बसचा काही भाग रस्त्याच्या मध्यभागी होता त्यामुळे च हा दुर्दैवी अपघात घडल्याचे तेथील तरुणांनी सांगितले. दरम्यान वाहन चालक व प्रवाशांच्या म्हणण्यानुसार मान्यता प्राप्त परिवहन महामंडळाच्या बसेसला पाठीमागून रिप्लेक्टर नसल्यामुळे या गंभीर अपघाताला संबंधित अपघातग्रस्त करून नवनाथ साबळे यांना आपला जीव गमावा लागला. परिवहन विभागाकडून अपघात रोखण्यासाठी मात्र साखर कारखान्यांच्या अवजड ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना रिप्लेटकलरची गाळप हंगामात सक्ती करण्यात आली. परंतु परिवहन महामंडळाच्या बसेसलाच रिफ्लेक्टर बसवण्यात न आल्याने आता त्यांच्यावर कोणत्या कायद्यानुसार कारवाई होते. याकडे मात्र आता प्रवासी व वाहन चालकांचे लक्ष लागले आहे. मुळातच रस्ते वाहतुकी संदर्भात साखर कारखान्याच्या गाळप हंगामात वाहन मालक व वाहन चालकांना प्रबोधन करून रिप्लेटरची सक्ती करत दंडात्मक कारवाईसाठी सूचना करण्यात आल्या. आता मात्र परिवहन महामंडळाच्या बसेसच्या संबंधित अधिकाऱ्यांवर रिप्लेक्टर नसल्याने कोणत्या कलमानुसार कारवाई करणार? असा सवाल देखील अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे. दरम्यान लिंपणगाव येथे श्रीगोंदा डेपोची परिवहन महामंडळाची लिंपणगाव येथे बस नादुरुस्त झाली त्यावेळेस संबंधित चालकाने एसटीच्या पाठीमागे लिंबाच्या झाडाच्या फांद्या लटकवण्यात आल्या होत्या. असे देखील येथील मदतीसाठी आलेल्या तरुणांनी यावेळी सांगितले. त्यामुळे या गंभीर अपघाताची श्रीगोंदा पोलिसांकडून कोणती कारवाई करण्यात येणार आहे. हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. या राष्ट्रीय महामार्गावरील सततचे अपघात रोखण्यासाठी तात्काळ डिव्हायडर बसवावेत अशी मागणी देखील अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.