युवकांनी आरोग्य जपले पाहिजे कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे : डॉ. विकास सोमवंशी

By : Polticalface Team ,26-01-2025

युवकांनी आरोग्य जपले पाहिजे कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे : डॉ. विकास सोमवंशी

लिंपणगाव (प्रतिनिधी):

 बिघडलेली जीवनशैली, वातावरण व मानसिकता यामुळे आयुर्मान कमी झालेले आहे. आजची तरुण पिढी विविध प्रकाराच्या आजाराने जडली आहे. त्यासाठी तरुणांनी आपल्या आयुष्यात सुखी जीवन जगण्यासाठी आरोग्य जपले पाहिजे. आपल्या आयुष्यात तरुणांनी ध्येय निश्चिती करून त्याचा मागोवा घेऊन पुढे चालले पाहिजे. उत्तम आरोग्य हीच  खरी संपत्ती आहे, असे प्रतिपादन  श्रीगोंदा शहरातील  प्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉ. विकास सोमवंशी  यांनी केले.

श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्यावतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरात " युवकांचे आरोग्य" या विषयावर ते बोलत होते.

 यावेळी नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. लक्ष्मणराव रायकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विशेष उपस्थिती म्हणून श्री. सुभाष काका शिंदे, माजी व्हा. चेअरमन तथा विद्यमान संचालक नागवडे सहकारी साखर कारखाना हे होते. या कार्यक्रमासाठी  सौ. नंदिनीताई वाबळे  (काकी ) या अध्यक्ष म्हणून होत्या.

यावेळी डॉ. सोमवंशी म्हणाले की उत्तम आरोग्य घडवण्यासाठी युवकांनी आरोग्य सूत्रे पाळले पाहिजे. त्यामध्ये योग्य आहार, विहार, आराम, कसरत आणि निश्चय यांनी जीवन आनंददायी होते. माणसाचे जीवनाचे विविध टप्पे आहेत. प्राण्यांसारखे जीवन वेगवेगळ्या टप्प्यातून जात असते. जसे की, पहिला टप्पा माकडासारखा, दुसरा टप्पा माणसासारखा, तिसरा टप्पा बैलासारखा, अंतिम टप्पा वटवाघुळ सारखा असतो.

 या व्याख्यानाचे नियोजन विद्यार्थी व विद्यार्थिनींनी केले. सूत्रसंचालन कु. सुद्रिक वैष्णवी व  कु. तेजस्विनी सुपेकर  या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  कु. कदम शुभम  याने, तर आभार रवींद्र भिसे याने केले.

या कार्यक्रमा प्रसंगी डॉ. मनन्मत लोहगावकर, डॉ. अभंग संदिप, प्रा. प्रशांत ढाके, प्रा. मनोहर उंडे  हे उपस्थित होते.

 या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या सुरुवातीला स्वयंसेवकांनी गावात स्वच्छता मोहीम राबवली.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. मनोहर सूर्यवंशी, प्रा. मिलिंद बेडसे, प्रा. कु. कोमल कांबळे, डॉ. सखाराम पारखे, प्रा. सागर रोडे,प्रा. दिपाली गायकवाड, प्रा. राजेश्री भागवत, प्रा. वैभवी साबळे, बाबा शिंदे  यांनी प्रयत्न केले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी