श्रीगोंद्यात राष्ट्रीय ग्राहक दिनात पुन्हा अधिकाऱ्यांची दांडी अनुपस्थित अन्य अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार- नायब तहसीलदार अमोल बन

By : Polticalface Team ,28-01-2025

श्रीगोंद्यात राष्ट्रीय ग्राहक दिनात पुन्हा अधिकाऱ्यांची दांडी      अनुपस्थित अन्य अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार- नायब तहसीलदार अमोल बन

   लिंपणगाव (प्रतिनिधी) श्रीगोंद्यात राष्ट्रीय ग्राहक दिनास तहसीलदारांनी संबंधित अन्य विभागातील अधिकाऱ्यांना ग्राहक दिनास उपस्थित राहण्यासाठी पत्राद्वारे कळवले. परंतु पंचायत समिती पुरवठा विभाग यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही विभागाचे अधिकारी या ग्राहक दिना उपस्थित न राहिल्याने ग्राहक पंचायत चळवळ व ग्राहक संघटनांचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते जितेंद्र पितळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत पात्रद्वारे तक्रार दाखल केली होती या तक्रारीत ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना 24 डिसेंबर रोजी ग्राहक दिनास निमंत्रण मिळाल्याने ग्राहकपंचायतीचे जितेंद्र पितळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका पत्राद्वारे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर  दखल घेत तातडीने ग्राहक दिन पुन्हा साजरा करण्याच्या सूचना तहसीलदारांना देण्यात आल्या होत्या त्यानुसार तहसील विभागाच्या पुरवठा विभागाने पुन्हा 28 जानेवारी रोजी ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले होते परंतु पुन्हा या ग्राहक दिनास अन्य विभागातील अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.. सदर ग्राहक पंचायतीचे व ग्राहक संघटनांचे पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करून तात्काळ ग्राहक दिनाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयांकडे पाठवण्याचा आदेश एका पत्राद्वारे तहसील विभागाला देण्यात आला होता. त्यानुसार दि 28 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता राष्ट्रीय ग्राहक दिन आयोजित करण्यात आला होता. नायब तहसीलदार अमोल बन यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्राहक पंचायतीचे सर्व पदाधिकारी ग्राहक संघटनांचे पदाधिकारी या ग्राहक दिनास मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंतु तालुक्यातील विविध विभागातील अधिकारीच उपस्थित नसल्याने ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तशा भावना ग्राहकांनी देखील व्यक्त करण्यात आल्या होत्या. या ग्राहक दिनास श्रीगोंदा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी राणीताई फराटे; सहाय्यक गटविकास अधिकारी मनोज बनकर; यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही विभागातील अधिकाऱ्यांनी पत्राद्वारे कळूनही उपस्थिती न दाखवल्याने ग्राहक संघटनाची मोठी घोर निराशा झाली. या प्रश्न ग्राहकपंचायतीचे प्रा विजय निंभोरे यांनी नायब तहसीलदारांना म्हटले आहे की ज्या विभागातील अधिकाऱ्यांनी पत्राद्वारे करूनही ग्राहक दिनास दांडी मारली. त्याचा अहवाल तातडीने साजरा करून त्याची प्रत आमच्याकडे द्यावी; आम्ही ती तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांशी याबाबत संवाद साधून आमच्या ग्राहकपंचायतीच्या भावना जिल्हाधिकाऱ्यांना सादर करू. अशा सूचना नायब तहसीलदार अमोल बन यांच्यासमोर मांडल्या. 

       याप्रसंगी राज्य पानंदरस्ते शेतकरी चळवळीचे समन्वयक दादासाहेब जंगले यांनी यावेळी बोलताना सांगितले की; जास्त करून शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. राज्य सरकारने ज्या शेतकऱ्यांचे वहिवाटीचे व पानंद रस्ते अडवले आहेत  त्या शेतकऱ्यांना अर्जानुसार तात्काळ कार्यवाही करून रस्ते खुले करण्यासाठी जे आपल्याकडे प्रकरणे आहेत ते तात्काळ निकाली काढून शेतकऱ्यांना वहिवाटीसाठी रस्ता खुला करून देण्याची सूचना यावेळी मांडली विशेषता श्रीगोंदा च्य तहसीलदार  डॉ क्षितिजा वाघमारे यांनी शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन ही मोहीम श्रीगोंदा तालुक्यात उत्तम प्रकारे राबवले आहे त्याबद्दल त्यांनी तहसीलदारांचे अभिनंदन देखील केले.


        याप्रसंगी ग्रामपंचायत जितेंद्र पितळे; एडवोकेट रमेश जठार; अनंता पवार; पत्रकार अंकुश शिंदे; योगेश चंदन; दत्ताजी जगताप; राजाराम मेहेत्रे सर आदींसह अन्य उपस्थित ग्राहकांनी यावेळी ग्राहक पंचायत चळवळ व पुरवठा विभाग यांच्यामध्ये सुसंवाद असावा ज्या ग्राहकांना शासकीय कामात अडचणी येतात. तेथे तात्काळ तक्रारीनुसार मार्ग निघावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. 

      यावेळी नायब तहसीलदार अमोल बन यावेळी बोलताना म्हणाले की; ग्राहक दिनाची सूचना संबंधित सर्व विभागातील अधिकाऱ्यांना देऊनही अनुपस्थित राहिले त्याबाबत आपण तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करणार आहोत. पुढील 15 मार्च रोजी होणाऱ्या जागतिक ग्राहक दिना आज उपस्थित केलेल्या ग्राहकांच्या समस्या मार्गी लावण्यात येतील. असे आश्वासन यावेळी उपस्थित ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी ग्राहक जनजागृती मंचाच्या पदाधिकाऱ्यांसह ग्राहकांना यावेळी दिल्या. 

      या ग्राहक दिनास जेष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर; राजाराम मेहत्रे सर; पिटर रणसिंग; दादासाहेब शिरवाळे दादासाहेब जंगले; दीपक वाल्हेकर; पत्रकार शिवाजी साळुंखे; प्रा विजय निंभोरे सर यांच्यासह पुरवठा निरीक्षण अधिकारी ज्ञानेश कोरे; पुरवठा निरीक्षक प्रज्ञा थोरात आदी यावेळी उपस्थित होते. आभार विजय निंभोरे सर यांनी मानले.



वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.