श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची जोरदार आवक . सोमवारी मिळाला कांद्याला 2700 रुपये भाव . रास्त दर व त्वरित पेमेंट मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा राज ट्रेडर्स कडे ओढा . शेतकऱ्यांच्या सोयीसाठी नजीकच्या काळात तीन ठिकाणी उपबाजार सुरू करणार - सभापती अतुल लोखंडे

By : Polticalface Team ,29-01-2025

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची जोरदार आवक . सोमवारी मिळाला  कांद्याला 2700 रुपये भाव . रास्त दर व त्वरित पेमेंट मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा राज ट्रेडर्स कडे ओढा . शेतकऱ्यांच्या सोयीसाठी नजीकच्या काळात तीन ठिकाणी उपबाजार सुरू करणार - सभापती अतुल लोखंडे श्रीगोंदा - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली असून सोमवारी एक नंबरच्या चांगल्या प्रतीच्या कांद्याला 2700 रुपये दर मिळाला . येथे शनिवार व्यतिरिक्त आठवडाभर कांद्याची आवक होत असते व दिवसातून तीन वेळा कांद्याचा लिलाव होतो . श्रीगोंदा तालुक्यातील कांद्याची प्रतवारी चांगली असल्याने तामिळनाडू , आंध्र प्रदेश , ओडीसा , पश्चिम बंगाल , केरळ आदी ठिकाणाहून येथील कांद्याला मागणी असते . येथून बांगलादेश , दुबई , कोलंबो आदी ठिकाणी माल पाठवला जातो . मध्यवर्ती असलेल्या श्रीगोंदा कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये शेजारील कर्जत , दौंड , शिरूर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी कांदा आणतात . सोलापूर , कोल्हापूर , सांगली , पुणे येथील भावाप्रमाणे श्रीगोंदा येथे भाव मिळत असल्याने शेतकरी येथे आपला माल देणे पसंत करतात . कारण बेंगलोर , कोल्हापूर , सोलापूर , सांगली आदी ठिकाणी मालवाहतुकीसाठी येणारा खर्च वाचतो व दरही तोच मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी येथेच आपला माल देणे पसंत करीत आहेत . त्यामुळे दिवसेंदिवस आवक वाढत असल्याचे बाजार समितीचे संचालक व्यापारी लौकिक मेहता , गौरव पोखर्णा , मयूर बोरा व दिपक भंडारी यांनी सांगितले . तालुक्यातील भानगाव , टाकळी लोणार , कोथुळ , कोसेगव्हाण , पिसोरे , तांदळी दुमाला , घोटवी , देऊळगाव , घुगलवडगाव , सुरोडी, वडाळी , चिंभळा , हंगेवाडी , बेलवंडी व परिसरातील शेतकरी नेहमीच कांदा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करून भरपूर उत्पन्न घेत आहेत . सध्या गुलाबी कांद्याची चांगली आवक असून दोन-तीन आठवड्यानंतर गावरान कांदा येण्यास सुरुवात होईल असे व्यापाऱ्यांनी सांगितले . सोमवारी झालेल्या लिलावा मध्ये एक नंबर चांगल्या प्रतीच्या कांद्यास 2700 रुपये भाव मिळाला , तर त्याखालील दोन नंबर कांद्यास पंधराशे ते दोन हजार रुपये भाव मिळाला तर तीन नंबर कांद्यास त्यापेक्षा थोडा कमी भाव मिळाला . वाहतूक खर्च कमी लागत असल्याने शेजारील तालुक्यातील शेतकऱ्यांना मध्यवर्ती असलेल्या श्रीगोंदा येथील बाजार समितीमध्ये कांदा देणे सर्व दृष्टीने फायद्याचे वाटते . येथील व्यापाऱ्यांनी मालाचे योग्य वजन , रोख पेमेंट व चांगली सेवा देण्याची परंपरा कायम ठेवल्याने शेतकऱ्यांचा श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती वरील विश्वास वाढत आहे . यापुढे कांदा मार्केट वर विशेष लक्ष देऊन नजीकच्या काळात काष्टी , कोळगाव व देवदैठण येथे उपबाजार सुरू करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जवळ मार्केट उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी सांगितले . ज्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ , वाहतूक खर्च वाचून त्यांच्या पदरात जास्त पैसे पडतील .
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.