मेजर भीमराव उल्हारे यांनी महामानव बाबा आमटे संस्थेच्या आदिवासी विद्यार्थ्यांसमवेत अभिष्टचिंतन सोहळा साजरा

By : Polticalface Team ,31-01-2025

मेजर भीमराव उल्हारे यांनी महामानव बाबा आमटे संस्थेच्या आदिवासी विद्यार्थ्यांसमवेत अभिष्टचिंतन सोहळा साजरा

 लिंपणगाव (प्रतिनिधी)- संघर्षनामा मल्टीमीडियाचे संपादक व जेष्ठ पत्रकार मेजर भीमराव उल्हारे यांनी आपला अभिष्टचिंतन सोहळा श्रीगोंदा तालुक्यातील घुगलवडगाव येथील महामानव बाबा आमटे संस्थेच्या आदिवासी विद्यार्थ्यांसमवेत उत्साही वातावरणात साजरा करून आपली सामाजिक बांधिलकी अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता तालुक्यातील पत्रकार बांधवांसह काही  व सामाजिक कार्यकर्त्यांसमवेत या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 

    या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी महामानव बाबा आमटे संस्थेतील आदिवासी मुलांसाठी शालेय साहित्य व स्नेहभोजन वाटप करण्यात आले.

      यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संदीप नागवडे; श्रीगोंदा बाजार समितीचे संचालक आदिक वागणे; ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर; पत्रकार विशाल चव्हाण; पत्रकार किशोर मचे; पत्रकार जावेद इनामदार; पत्रकार शेफिक हवालदार; पत्रकार सुहास कुलकर्णी; पत्रकार उज्वला उल्हारे; श्रीरंग साळवे पत्रकार दत्ताजी जगताप; तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष माधव बनसोडे; पिटर रणसिंग; संदीप रोडे; आढळगावचे सरपंच संजय निगडे; सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब शिरवाळे; विनायक ससाने; मेजर निळकंठ उल्हारे माधव उल्हारे महामानव बाबा आमटे संस्थेचे अनंत झेंडे व त्यांच्या सुविद्या; मीराताई उल्हारे; मातोश्री सुभद्रा उल्हारे हिराबाई गोरखे; सतीश ओहोळ यांच्यासह मेजर उल्हरे यांचे सर्व आप्तेष्ट नातेवाईक मित्रपरिवार व कुटुंबातील सदस्य विद्यार्थी; यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे आपल्या शुभेच्छा पर भाषणात म्हणाले की; केंद्र व राज्य सरकारमधील कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर आपले उर्वरित आयुष्य कुटुंबासाठी व शरीर स्वास्थ्यासाठी अर्पण करत असतात. परंतु मेजर उल्हारे यांनी भारतीय संरक्षण सेवेमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर अनेक सामाजिक कार्यात सहभाग घेऊन आपले कर्तुत्व दातृत्व समाजाच्या विविध घटकांसाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये त्यांना विविध पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. एवढ्यावरच न थांबता मेजर उल्हाऱे यांनी गेल्या अकरा वर्षापासून संघर्ष नामा मल्टीमीडिया च्या माध्यमातून प्रखर लेखणी द्वारे समाजाभिमुख पत्रकारिता करून एक आपला आदर्श निर्माण केल्याचे श्री नागवडे यांनी सांगितले. 

      यावेळी सत्काराला उत्तर देताना मेजर भीमराव उल्हारे यावेळी म्हणाले की; आपण 1997 रोजी भारतीय संरक्षण सेवेतून निवृत्त झाल्यानंतर सामाजिक कार्याचा वसा अंगीकारला. त्याबरोबरच गेल्या अकरा वर्षांपासून संघर्ष नामा मल्टीमीडिया च्या माध्यमातून तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या सहवासात राहून पत्रकारितेचा बाणा हाती घेतला. त्यातून सामाजिक राजकीय व विविध प्रश्नांना वाचा फोडत न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. संघर्ष नामाच्या मल्टीमीडियाच्या सारथीमध्ये भर पडत असताना माझ्या कुटुंबियांनी सतत आधार दिला. निश्चितपणे यापुढे पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाच्या प्रश्नाशी बांधिल असणार आहे  अशी ग्वाही देत उल्हारे यांनी शुभेच्छांबद्दल सर्वांना धन्यवाद दिले. 

           याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष माधव बनसुडे; ज्येष्ठ पत्रकार विशाल चव्हाण; दत्ताजी जगताप; आदेश वांगणे; पीटर रणसिंग; किशोर मचे; संतोष शिंदे; वसंत सकट; सतीश ओहोळ आदींसह उपस्थित पत्रकार व मान्यवरांनी मेजर उल्हारे यांना शुभेच्छा व्यक्त केल्या. सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे यांनी केले आभार मेजर निळकंठ उल्हारे यांनी मानले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.