महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात फूड फेस्टिवल, पुष्प रचना सजावट, फनी गेम्स, संगीत खुर्ची या उपक्रमांना उदंड प्रतिसाद

By : Polticalface Team ,02-02-2025

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात फूड फेस्टिवल, पुष्प रचना सजावट, फनी गेम्स, संगीत खुर्ची या उपक्रमांना उदंड प्रतिसाद


श्रीगोंदा (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेचे महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्ताने फूड फेस्टिवल, पुष्परचना सजावट, फनी गेम्स, संगीत खुर्ची इत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मिस मॅच डे साजरा करण्यात आला. या उपक्रमांना उदंड असा प्रतिसाद लाभला. या समारंभाचे उद्घाटन महाविद्यालय विकास समितीचे सदस्य महावीर पटवा यांच्या हस्ते करण्यात आले. ते म्हणाले की, महाविद्यालयीन युवक युवतींनी उद्याच्या उद्योग व्यवसायाच्या वाटा अशा उपक्रमातून शोधाव्यात आणि आपले व्यक्तिमत्त्व समृद्ध करावे. अध्यक्षस्थानी  प्राचार्य डॉ. महादेव जरे होते. विद्यार्थ्यांच्या कलात्मक व व्यावसायिक उर्मिंना जागृत करण्यासाठी असे उपक्रम  उपयोगी ठरतात. त्याचा आनंद घ्या. असे ते म्हणाले. 

याप्रसंगी फूड फेस्टिवलचे समन्वयक, वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ. रावसाहेब काळे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. पुष्परचना सजावटीचे समन्वयक म्हणून डॉ. हरिभाऊ  वाघिरे यांनी काम पाहिले. फनी गेम्सचे समन्वयक म्हणून शारीरिक शिक्षण संचालिका प्रा. कल्पना बागुल, क्रीडा शिक्षक प्रा. संजय डफळ यांनी काम पाहिले. या समारंभाला उदंड प्रतिसाद लाभला उपप्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, उपप्राचार्य शहाजी मखरे, पर्यवेक्षक प्रा. रत्नाकर झिटे,डॉ. सुदाम भुजबळ, डॉ. नितीन थोरात, कार्याध्यक्ष डॉ. बापू देवकर, प्रा. सौ. सुनिता सोनावळे, श्री रघुनाथ लबडे , सांस्कृतिक विभागाचे डॉ. राजाराम कानडे, प्रा. रमेश थोरात,एन.सी.सी. विभागाचे प्रमुख डॉ. किरण ढवळे, एन.एस.एस.चे प्रमुख प्रा. भाऊसाहेब बुलाखे, प्रा. देवेंद्र बहिरम, डॉ. राहुल गायकवाड, अधीक्षक बाळासाहेब राऊत तसेच या समारंभाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. राम ढगे यांनी केले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी