पेडगाव येथे दारू, गुटखा, अमली पदार्थ, विक्री विरोधात पार पडली विशेष महिला ग्रामसभा.

By : Polticalface Team ,04-02-2025

पेडगाव  येथे दारू, गुटखा, अमली पदार्थ,  विक्री विरोधात पार पडली विशेष महिला ग्रामसभा. श्रीगोंदा प्रतिनिधी :31/01/2025 रोजी ज्येष्ठ महिला सौ. प्रमिला काकडे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11:00 वाजता विशेष महिला सभा पार पडली. यावेळी लोकनियुक्त सरपंच श्री. इरफान पिरजादे, उपसरपंच श्री.युवराज बबन शिंदे, ग्रामपंचायत सदस्या सौ. रेश्मा सल्लाउद्दीन तांडेल, सौ.सोनम इरफान पिरजादे, सौ. योगिता अशोक गोधडे, सौ. अश्विनी अमोल भोसले, श्री. विनोद म्हस्के ग्रा.पं. सदस्य ,श्री. प्रीतम पवार तसेच राष्ट्रवादी काँगेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष श्री.हरिदास आबा शिर्के, महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष, मार्केट कमिटी सदस्य श्री. प्रशांत भैया ओगले, सोसायटी चेअरमन श्री. रोहिदास पवार , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. भगवान आप्पा कणसे , डॉ. श्री मैनुद्दीन शेख, श्री.हसनभाई शेख, श्री.अशोक गोधडे, श्री.शकुरभाई शेख, पत्रकार श्री.महादेव गावडे ग्रामपंचायत अधिकारी श्री. ज्ञानेश्वर महाडुळे, तसेच तलाठी श्री. वडमारे भाऊसाहेब, आरोग्य विभागाच्या सौ. डॉ. मोहिनी खामकर, पशुवैद्यकीय अधिकारी कु. गायकवाड मॅडम, श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पो.. श्री.शिंदे साहेब, श्री. मरकड साहेब, श्रीमती. खेडकर मॅडम इत्यादी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. गावतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या सभेत महिलांच्या मागणीनुसार गावामध्ये अवैध्यरित्या होणारी दारू, गुटखा, अमली पदार्थ विक्री ताबडतोब बंद झाली पाहिजे ही मागणी महिलांनी मांडली. उपस्थित महिलांमधून अवैध व्यवसायामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल महिलांनी निर्भिडपणे व्यथा माडल्या. व या कार्यक्रमात सरपंच यांच्या पाठीमागे उभे राहू असे ठासून सागितले. तसा अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी ठराव या ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. तसे पत्र व मंजूर ठराव संबंधित विभागाला पाठविण्यात आला. हे अवैध धंदे बंद न झाल्यास लोकनियुक्त सरपंच श्री. इरफान पिरजादे हे स्वत: उपोषणास बसणार आहेत असा इशारा त्यांनी प्रशासनास दिला आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी