यवत पोलीस स्टेशन हद्दीतील जबरी चोरी व घरफोडी करणारी टोळी जेरबंद.१४ घरफोडी चोरीचे गुन्हे उघड. दोन आरोपी अटक

By : Polticalface Team ,09-02-2025

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील जबरी चोरी व घरफोडी करणारी टोळी जेरबंद.१४ घरफोडी चोरीचे गुन्हे उघड. दोन आरोपी अटक दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दि.२६/०१/२०२५ रोजी रात्रौ ११.४५ वाचे सुमारास मौजे नेवसेवस्ती खोर,ता. दौंड जि.पुणे येथे फिर्यादी नामे उत्तम शंकर नेवसे यांच्या राहते घरामध्ये प्रवेश करून सुरा तसेच कोयत्याचा धाक दाखवून अनोळखी तीन इसमांनी घरातील कपाटात ठेवलेले ३०,०१७/-रु. रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने चोरून नेले आहे. वगैरे मजकुराचे फिर्यादी वरून यवत पोलीस स्टेशन गु. रजि. नं.८२/२०२५ भा. न्या.सं.२०२३ कलम ३०९ (४),३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यवत पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मौजे खोर परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक केले तसेच सदर गुन्हयाच्या अनुषंगाने माहिती प्राप्त केली असता सदरचा गुन्हा हा रोहित उर्फ पिल्या प्रविण पवार, रा. आळंदी म्हातोबाची ता. हवेली जि. पुणे याने व त्याचे साथीदारांनी केला असल्याचे गोपनीय माहिती यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाला मिळाली. सदर गुन्हयातील आरोपी हे सोने विक्री करिता भांडगाव या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाल्याने यवत गुन्हे शोध पोलीस पथकाने सापळा रचून व वेशांतर करून तीन संशयित इसमांना ताब्यात घेवून चेक केले असता इसम नामे नितीन सुकराज भोसले, रा. सुपा ता. दौंड जि.पुणे याचेकडे स्वीच ऑफ विवो कंपनीचा मोबाईल मिळून आला. सदर मोबाईलबाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सदरचा मोबाईलबाबत माहिती घेतली असता सदरचा विवो कंपनीचा मोबाईल हा मौजे खोर येथे चोरी केलेल्या ठिकाणचा फिर्यादी यांचा असल्याचे समजले. सदर संशयित इसमांना सदर गुन्हयाचे अनुषंगाने तपासकामी ताब्यात घेवून सखोल चौकशी केली असता सदरचा गुन्हा हा १) रोहित उर्फ पिल्या प्रविण पवार, रा. आळंदी म्हातोबाची ता. हवेली जि. पुणे २) नितीन सुकराज भोसले, वय ३१ वर्षे ३) रोहित राजेश काळे, वय २२ वर्षे दोघे रा. सुपा ता. बारामती जि. पुणे यांनी केला असून त्यांचा एक साथीदार नामे ४) आयशाम विलास भोसले, रा. सुपा ता. बारामती जि.पुणे यांनी संगणमताने केला असल्याची कबुली दिली. त्यांना सदर गुन्हयाचे कामी अटक करण्यात आले असुन पोलीस कस्टडी चौकशी दरम्यान त्यांनी यवत पोलीस स्टेशन हदिदतील इतर १३ घरफोडी चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली. सदर आरोपींकडून एकूण १४ गुन्हयातील १२० ग्रॅम सोन्याचे दागिने, १५ भार चांदीचे दागिने, ३०,०१७ रू. रोख रक्कम तसेच गुन्हयात वापरण्यात आलेली मोटारसायकल असा एकूण १२,३०,०१७ रू. किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही मा.श्री. पंकज देशमुख पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, मा.श्री. गणेश बिराजदार अपर पोलीस अधिक्षक बारामती, मा.श्री. बापुराव दडसं उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड, मा.श्री. अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहा. पोलीस निरीक्षक महेश माने, पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज, सपोनि राहूल गावडे (स्था.गु.शा), पो.हवा. संदीप देवकर, पो. हवा. गुरुनाथ गायकवाड, पो. हवा. अक्षय यादव, पो.हवा. विकास कापरे, पो.हवा. दत्ता काळे, पो.हवा. महेंद्र चांदणे, पो.हवा. रामदास जगताप, सफी सुभाष शिंदे, सफौ सचिन घाडगे (स्था.गु.शा), पो.हवा. अजित भुजबळ (स्था.गु.शा), पो. हवा. विजय कांचन (स्था.गु.शा), पो.कॉ. धिरज जाधव (स्था.गु.शा), पो.कॉ. मारूती बाराते, पो.कॉ. अमोल भुजबळ, पो.कॉ. मोहन भानवसे यांचे पथकाने केली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

पहा स्वामी समर्थ प्रकटदिन विशेष माहिती

दौंड शालीमार चौकामध्ये बेकायदा कल्याण मटका जुगार.पैसे घेऊन लोकांना मटका खेळणाऱ्या इसमावर पोलीसांनी केली कारवाई

दौंड शहर गांधी चौक येथील जुगार अड्ड्यावर पोलीसांची छापेमारी चौघांन विरुद्ध गुन्हा दाखल 1 हजार 400 रुपये मुद्देमाल केला जप्त.

श्रीगोंदा तहसील व भूमी अभिलेख कार्यालयाकडून श्रीगोंदा तालुका राज्याला दिशादर्शक रोड मॉडेल बनवण्याचा ऐतिहासिक निर्णय!

के पी जाधव हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चिंभळे बारावीच्या परीक्षा केंद्रावर संपूर्ण परीक्षा सुरळीत संपन्न

श्री व्यंकनाथ विद्यालयाने शंभर दिवस विविध उपक्रमांचे विस्ताराधिकाऱ्यांकडून समाधान

काष्टी येथील परिक्रमा तंत्रनिकेतन महाविद्यालयाची यशोगाथा, 39 विद्यार्थ्यांची बजाज ऑटो लि.नामांकित कंपनीमध्ये निवड

काष्टी येथील परिक्रमा तंत्रनिकेतन महाविद्यालयाची यशोगाथा, 39 विद्यार्थ्यांची बजाज ऑटो लि.नामांकित कंपनीमध्ये निवड

23 व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘गिरान’ची विशेष निवड

जबरी चोरीच्या उद्देशानेच आरोपी गेले होते. इतर कोणताही उद्देश नव्हता चोरांची कबुली. मा.पोलीस अधिक्षक पंकज देशमुख

सहजपुर गाडमोडीत कल्याण मटका जुगार जोरदार. अवैध धंदे चालवणाऱ्या महाठकांचा तत्काळ बंदोबस्त करा. नागरीकांची मागणी.

कडेठाण येथील लता बबन धावडे यांचा वन्य प्राण्यांच्या हल्लात मृत्यु झाला नाही. प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोग शाळा नागपुर अहवाल प्राप्त. दगडाने ठेचुन जिवे ठार मारले.

दौंड तालुक्यातील मौजे भांडगाव येथील लक्ष्मी इन्टर प्रायजेस या कंपनीतील आगीमध्ये सुमारे ३५ लाख रूपयांचा माल जळून खाक.

पाटबंधारे विभागाच्या हद्दीत पत्रा शेड तयार करून १ लाख ५० हजार घेऊन विक्री. निराधार विधवा महिलेची फसवणूक.

मुळा मुठा कालवा पुलाच्या अपूर्ण बांधकामामुळे कासुर्डी नागरिकांना घालावा लागतोय दुरुन वळसा.

महाराजा जिवाजीराव शिंदे विद्यालयात 395 वी शिवजयंती उत्साहात साजरी

ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी कारवाईची मागणी

मराठी चित्रपट लवेरिया थेट YouTube वर रिलीज; १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग एमपीएससी परीक्षेत श्रीगोंद्यातील दोन सख्या बहिणींनी केले यश संपादन

नगर दौंड राष्ट्रीय महामार्गावरील नवीन वृक्ष लागवडीचे घोडे अडले कुठे? , पाच वर्षांनंतरही वनविभागाचे अधिकारी वृक्ष लागवडी बाबत अनभिज्ञ नंदकुमार कुरुमकर

भारतीय बौध्द महासभा कोरेगाव मूळ ग्रामशाखेच्या वतीने माता रमाई जयंती साजरी. समता सैनिक दलाची साप्ताहिक परेड संपन्न.