बिबट्याच्या दहशतीमुळे श्रीगोंदा तालुक्यातील जनतेला जंगलात राहिल्यासारखे वाटते

By : Polticalface Team ,09-02-2025

बिबट्याच्या दहशतीमुळे श्रीगोंदा तालुक्यातील जनतेला जंगलात राहिल्यासारखे वाटते नंदकुमार कुरुमकर लिंपणगाव (प्रतिनिधी)-- श्रीगोंदा तालुक्यात बिबट्याची दहशत काही थांबता थांबेना! आज इथे बिबट्याला त्याने इथे हल्ला केला शेळी मारली कुत्रे मारले आता तर मात्र संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यातच बिबट्याचे सर्वत्र दर्शन होत असून; श्रीगोंदा तालुक्यातील जनतेला आता जंगलात राहिल्यासारखेच वाटत आहे. तशा तीव्र भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत. वाड्या वस्त्यांवरील ग्रामस्थांना या बिबट्याच्या दहशतीमुळे रात्रीचा दिवस करावा लागतो. श्रीगोंद्याच्या आमदारांनी विधानसभेत आवाज उठवून देखील बिबट्यांच्या संदर्भात कोणतीही अंमलबजावणी झालेली दिसून येत नाही. या सरकारला बिबट्या महत्त्वाचा वाटतो जगाचा पोशिंदा महत्त्वाचा वाटत नाही. त्यामुळे भाजप सरकार कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे. हे देखील जनतेला उशिरा कळले. तालुक्यात किती? बळी गेल्यानंतर राज्य सरकार या बिबट्यांच्या संदर्भात अंमलबजावणी करणार आहे. असा सवाल देखील श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांमधून व्यक्त केला जात आहे. श्रीगोंदा तालुक्यात वाढती बिबट्यांची संख्या लक्षात घेता वनविभागाचे कर्मचारी देखील हदबल होताना दिसत आहेत. कारण वनविभागातील अपुरा कर्मचारी वर्ग पिंजऱ्यांची संख्या देखील तुटपुंजी असल्यामुळे एखाद्या गावातून बिबट्याची खबर लागताच संबंधित वनकर्मचाऱ्यांची मात्र मोठी धांदल उडते. त्यामुळे राज्य सरकारने बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कायद्यात काही सुधारणा करून पिंजऱ्यांची संख्या देखील वाढवली पाहिजे. कारण बिबटे वाड्या वस्त्यांवर समोरील अंगणात येऊन जनावरे व लहान मुलांवर हल्ला होत आहे. त्यांचा बळी येत आहे ही मोठी दुर्दैवी घटना समोर येत आहे असे देखील शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे. * सद्यस्थितीला साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू आहेत. ऊस उत्पादकांचे ऊस साखर कारखान्यांना गाळपसाठी जात आहेत. उसाचे मळे देखील मोकळे होत आहेत त्यामुळे बिबट्यांना दडण्यासाठी जागा राहिली नाही अशा परिस्थितीत बिबटे तालुक्यात सैरभैर होताना दिसत आहेत. या उसाच्या फडामध्ये ऊस तोडणी होत असताना अनेक बिबट्यांची लहान लहान बछडे दिसून येत आहेत. अशा या थरारक परिस्थितीत ऊस तोडणी कामगार आपली उसाची तोड करतात. तर तालुक्यात अनेक वाड्या वस्तीवर राहणारे नागरिकांची डोळ्यादेखत पाळीव कुत्रे; शेळ्या; मेंढ्या; जनावरे; लहान बालके इत्यादींवर बिबट्या कडून हल्ल्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण पसरले आहे. ज्याप्रमाणे एखादा दहशतवादी हल्ला करतो आणि दहशत माजून निघून जातो. त्या पद्धतीने तालुक्यात बिबट्यांनी दहशत माजावल्याचे शेतकरी व ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे राज्य सरकारने संदर्भात ठोस भूमिका घेतली पाहिजे अशा भावना देखील शेतकरी वर्ग करत आहे. * तालुक्यातील शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार शेती वाहिनीच्या लोड शेडिंग मुळे शेतकऱ्यांना रात्री पिकांची भरणी करण्यासाठी शेतात थांबावे लागते. त्यामध्ये कमी दाबाने शेतीचा वीज पुरवठा होत असल्याने वारंवार वीजही खंडित होते. भरणी उरकत नाही. त्यात बिबट्यांची रात्रीची भटकंती होत असल्याने शेतकऱ्यांवर बिबट्यांकडून हल्ला होऊ शकतो. यासाठी महावितरणकडून रात्रीचा वीज पुरवठा शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने सुरळीत करावा. सध्या रात्रंदिवस गावठाण व शेती वाहिनीचा वीजपुरवठा अत्यंत कमी दाबाने होत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. यासाठी राज्य सरकारने तात्काळ शेती वाहिनीसाठी वीज पुरवठा पूर्ण दाबाने देण्यासाठी महावितरणला योग्य त्या सूचना द्याव्यात; कारण सध्या बिबट्याची दहशत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर असल्याने रात्री अपरात्री पिकांची भरणी करताना शेतकऱ्यांवर गंभीर हल्ला होऊ शकतो. त्यामुळे एक तर बिबट्यांच्या संदर्भात कायद्यात बदल करावा; अन्यथा प्रशिक्षण देऊन कर्मचारी भरती करावेत जेणेकरून बिबट्या पासून दहशत मुक्ती होईल यासाठी कठोर उपाय योजना कराव्यात; असे देखील शेतकऱ्यांनी नमूद केले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार श्रीगोंदा तालुक्यात प्रत्येक गावातून बिबट्या आल्याची खबर मिळते अशावेळी वाड्या वस्त्या मधून गावात लहान लहान मुले शाळेत येत असतात अशावेळी या शाळकरी मुलांवरही बिबट्या हल्ला करू शकतो अनेक पालक आपली शेतीची कामे बाजूला ठेवून मुलांना शाळेत दररोज बिबट्याच्या दहशतीमुळे घेऊन जाताना दिसत आहेत त्यामुळे राज्य सरकारने वन कर्मचाऱ्यांची भरती करून बिबट्यांसंदर्भात त्या नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन संबंधित कर्मचाऱ्यांना कर्तव्याची जाणीव करून द्यावी असे देखील गावोगावी शेतकरी बोलताना सांगतात सध्या श्रीगोंदा तालुक्यात बिबट्यांनी मोठा धुमाकूळ घातल्याचे दिसत आहे दररोज कुत्रे प्राण्यांवर हल्ला होत असून मागील दोन महिन्यांमध्ये अनेक निष्पाप बालकांचा या बिबट्यांनी बळी घेतल्याचे आपण सर्वांनीच ऐकले तर या बिबट्याच्या दहशतीमुळे शेतमजूर देखील शेतीच्या कामावर येण्यासाठी धाडस करत नाही त्यामुळे या गंभीर समस्यांमुळे शेतकरी वर्ग सध्या हैराण झाल्याचे दिसून येत असून राज्य सरकारने वन कर्मचाऱ्यांची तात्काळ भरती करून बिबट्या संदर्भात त्यांना योग्य ते प्रशिक्षण देऊनच रुजू करून घ्यावे कारण सद्यस्थितीला बिबट्यांच्या वाढत्या संख्याबळामुळे संपूर्ण तालुकाच दहशतीखाली येताना दिसत आहे राज्य सरकारकडून मात्र बिबट्यांचा बंदोबस्त करत नाही श्रीगोंदा तालुक्यातील बिबट्यांचे संदर्भात तालुक्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी देखील विधानसभेत आवाज उठवला मात्र राज्य सरकारने कोणतीच कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही आणखी किती बळी गेल्यानंतर बिबट्या संदर्भात उपाययोजना सरकार करणार आहे असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष