श्री व्यंकनाथ विद्यालयाने शंभर दिवस विविध उपक्रमांचे विस्ताराधिकाऱ्यांकडून समाधान

By : Polticalface Team ,11-03-2025

श्री व्यंकनाथ विद्यालयाने शंभर दिवस विविध उपक्रमांचे विस्ताराधिकाऱ्यांकडून समाधान लिंपणगाव( प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्री व्यंकनाथ विद्यालयाने शिक्षण विभागाने माध्यमिक स्तरावर शंभर दिवस उपक्रमांतर्गत घालून दिलेल्या उपक्रमाचे तंतोतंत पालन करून विद्यालयात सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्याने माध्यमिक शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी भीवसेन पवार यांनी विद्यालय तपासणीत समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान सोमवारी 10 मार्च रोजी माध्यमिक विभागाचे विस्तार अधिकारी श्री भिवसेन पवार यांनी विद्यालयात भेट देऊन विद्यालयाने विविध उपक्रमांचे तंतोतंत पालन केले आहे. तर विद्यालयाच्या तपासणी दरम्यान विद्यालयाचा स्वच्छ परिसर सीसीटीव्ही कॅमेरे चालू अवस्थेत दिसून आले. सखी सावित्री समिती स्थापन करून त्याचे इतिवृत्त नोंद सुस्थितीत दिसून आली. विद्यालयाचे सुशोभीकरण तसेच विविध वृक्षांची लागवड याप्रसंगी दिसून आली. मुला मुलींचे स्वच्छतागृह स्वतंत्र अवस्थेत असून स्वच्छता देखील उत्तम प्रकारे आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्यासाठी आरो फिल्टर चे पाणी उपलब्ध असल्याचे दिसून आले. विद्यालयात परसबाग; सौंदर्यपूर्ण असून; एकंदरीत शाळेचे शैक्षणिक वातावरण अत्यंत चांगल्या प्रकारे असल्याचा अभिप्राय विस्तार अधिकारी श्री पवार यांना दिसून आला. विद्यार्थ्यांची शालेय शिस्त सर्व वर्गांमध्ये अध्यापनाचे कामही शिक्षकांकडून चांगल्या प्रकारे समाधानकारकरीत्या दिसून आले आहे. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री ए. एल. पुराणे यांनी विद्यालयाच्या विविध उपक्रमाची इथंभूत माहिती यावेळी विस्तार अधिकाऱ्यांना यावेळी सांगितली. त्यामुळे श्री व्यंकनाथ विद्यालयाचे शैक्षणिक कामकाज अत्यंत समाधानकारक असल्याचा अभिप्राय देखील विस्तार अधिकारी भिवसेन पवार यांनी दिला. विद्यालयाच्या तपासणीनंतर प्राचार्य पुराणे यांनी विस्तार अधिकाऱ्यांचा सन्मान केला. यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक शिवाजी इथापे यांनी केले. आभार ज्येष्ठ शिक्षक ज्ञानदेव धायगुडे यांनी मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी