अखेर वृत्त प्रसिद्ध होताच इनामगाव ते ढोकराई रस्त्याचे बंद काम पुन्हा सुरू
By : Polticalface Team ,26-03-2025
लिंपणगाव (प्रतिनिधी)-श्रीगोंदा तालुक्याच्या सरहद्द समजल्या जाणाऱ्या इनामगावकडून ढोकराईकडे रस्ता दुरुस्तीचे काम गेल्या एक महिन्यापासून संबंधित ठेकेदाराने बंद केल्यामुळे या रस्त्याची मोठी दुरावस्था निर्माण झाली होती. या रस्त्याच्या प्रश्नाबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध होताच संबंधित ठेकेदाराने बंद केलेले रस्त्याचे काम पुन्हा सुरू केले आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान नागरिकांचा तक्रारीनुसार तालुक्याच्या आमदारांनी मोठ्या डामडौलात रस्त्याचे 16 फेब्रुवारी रोजी उद्घाटन केले. सदर प्रलंबित रस्त्याचे काम सुरू होत असल्याने आम्हालाही त्याचा आनंद होत होता. परंतु आमदारांचे हस्ते उद्घाटन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी संबंधित ठेकेदाराने रस्ता दुरुस्त करण्यासाठी जवळपास जुनी वांगदरी कॉर्नर इथपर्यंत दोन किलोमीटर अंतरावर रस्ता उकारल्यामुळे रस्त्याच्या दोन्हीही बाजूने वास्तव्य असणाऱ्या नागरिकांना वाहनांच्या ये-जा मुळे धुळीने सर्वजण हैराण झाले होते. अनेकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला होता.
दरम्यान या प्रश्नासंदर्भात वांगदरीचे युवक कार्यकर्ते तुषार भालचंद्र नागवडे यांच्यासह कार्तिक नागवडे; विजय नागवडे व पोपटराव राऊत आदी कार्यकर्त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला व या रस्त्याची कैफियत मांडली. या कैफियतीमध्ये तुषार नागवडे यांनी म्हटले आहे की; 16 फेब्रुवारी रोजी रस्ता दुरुस्तीचे तालुक्याचे आमदारांनी उद्घाटन केले. उद्घाटन केल्यानंतर तीनच दिवस संबंधित ठेकेदाराने जुनी वांगदरी कॉर्नर पर्यंत जेसीबीच्या साह्याने उकराउकरी करून यंत्रसामुग्री तेथून हलवली त्यामुळे रस्ता पुन्हा अस्तव्यस्त केला. त्यानंतर दररोज या रस्त्यातून वाहनांचे ये जा सुरू झाल्यानंतर वाहनांच्या धुळीमुळे वयोवृद्ध नागरिक; आजारी पेशंट; लहान बालके इत्यादींना या धुळीचा मोठा त्रास जाणू लागला. अनेक नागरिक व लहान मुले आजारी पडू लागली. तशा तक्रारी तक्रारदार कार्यकर्त्यांनी पत्रकारांकडे मांडल्या. या तक्रारींचे ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांनी सविस्तर वृत्त वृत्तपत्रात प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित ठेकेदाराला दोनच दिवसांमध्ये जाग आली. आणि या नादुरुस्त रस्ता कामास रविवारी 16 मार्च रोजी सुरुवात केली. सद्यस्थितीला या ठेकेदाराकडून रस्ता दुरुस्तीसाठी लागणारे खडी कच इत्यादी रस्त्याच्या कडेने टाकली जात आहे. या ज्वलंत प्रश्नासाठी जेष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांनी प्रसिद्धीच्या माध्यमातून आवाज उठवला. त्यामुळे प्रशासन व ठेकेदाराला जाग आल्याने रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. दरम्यान तालुक्याच्या सर्वांगीण प्रश्नावर प्रकाश ज्योत टाकणारे ज्येष्ठपत्रकार कुरुमकर यांनी सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सडेतोड लिखाण करून तालुक्यातील रस्ते; वीज; पाणी इत्यादी प्रश्नावर आवाज उठवला. त्यांच्या प्रखड लेखणीमुळेच तालुक्यातील अनेक प्रश्न मार्गी लागत आहेत. त्यातच इनामगाव ते ढोकराई या प्रलंबित रस्त्याला देखील पत्रकार कुरुमकर यांनी निर्भीडपणे वाचा फोडली. अशा प्रतिक्रिया वांगदरीचे युवक कार्यकर्ते तुषार भालचंद्र नागवडे; विजय नागवडे व कार्तिक नागवडे यांनी पत्रकार कुरुमकर यांची प्रशंस केली आहे. इनामगाव ते ढोकराई हा चार किलोमीटर अंतराचा रस्ता अत्यंत खड्डेमुळे बनल्यामुळे पाई चालणे देखील या रस्त्यातून सर्वांनाच जिकिरीचे बनले होते. त्यामुळे दळणवळणही विस्कळीत होताना दिसत होते. आता या रस्त्याला शासन स्तरावरून मंजुरी मिळाली आणि रस्त्याचे काम देखील सुरू झालेले आहे. त्याचे उद्घाटनही आमदार महोदयांच्या हस्ते करण्यात आले. आता रस्त्याचे काम विना विलंब उत्तम दर्जाचे व्हावे; अशी अपेक्षा देखील वांगदरीच्या ग्रामस्थांनी केली आहे.
वाचक क्रमांक :