By : Polticalface Team ,26-03-2025
लिंपणगाव (प्रतिनिधी) -संपत्ती वाढवण्यापेक्षा संपत्तीचा विनियोग प्रत्येकाने योग्य कामासाठी केला पाहिजे; संपत्ती कितीही वाढवा परंतु सुख मात्र परमार्थातच आहे. असे परखड मत दयानंद महाराज कोरेगावकर यांनी आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
वांगदरी तालुका श्रीगोंदा येथील ज्येष्ठ व्यक्तिमत्व एकनाथ साहेबराव नागवडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ कीर्तनकार दयानंद महाराज कोरेगावकर यांची किर्तन सेवा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी आपल्या किर्तन रुपी सेवेत भाविकांसमोर बोलताना दयानंद महाराज म्हणाले की; हा देह नाशिवंत आहे. याचा भरवसा नाही. कोणत्या क्षणी धोका देईल हे देखील सांगता येत नाही. जोपर्यंत जीव आहे. तोपर्यंत सत्कार्य करा; भगवंताचे नामस्मरण प्रसंगी परमार्थिक मार्गाकडे वळा. निश्चितच भगवंत प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. असे सांगून महाराज आणखी पुढे म्हणाले की; जो कलेने बोलतो; त्याचा फायदा होतो. ज्याला कलेने बोलता येत नाही तो मागे राहतो. त्यासाठी प्रत्येकाचे नॉलेज देखील भखम असायला हवे. सत्ता संपत्ती ही नशिबाने बघता येईल. आयुष्य खातो काळ तुकोबारायांनी सावधान ही उपमा दिलेली आहे. प्रत्येकाने समाधानी असायला हवे. प्रत्येक जण ज्ञानी व हुशार आहेत. जीवनात मोह असा गुण आहे की; जोपर्यंत बुद्धी विचारांशी संलग्न होत नाही. तोपर्यंत कोणतेही साध्य होत नाही. सद्यस्थितीला व्यवहारिक जगामध्ये प्रत्येक जण मग्न दिसतो. असे सांगून दयानंद महाराज आणखी पुढे म्हणाले की; जवळच्या माणसांवर कधीच अति विश्वास ठेवायचा नाही. तितकाच विश्वासाने घात देखील झाल्याशिवाय राहणार नाही. ही वस्तुस्थिती सध्या प्रत्येक जण अनुभवतो आहे. त्यासाठी प्रत्येकाने जीवन उत्तम तर्हेने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
दयानंद महाराज पुढे आणखी म्हणतात की; जीवनामध्ये कुणाच्या संगतीत आपण राहतो. त्याच्यावर आपली जीवनाची खरी विचारधारा ठरते. नव्हे; नव्हे तर संतांच्या संगती मध्ये एक परमार्थिक आनंद मिळतो. तो देखील प्रत्येकाने घेतला पाहिजे. दयानंद महाराज आणखी पुढे म्हणतात की; अविचारी माणसाची संगत करू नये. चांगल्या माणसाची संगत असावी. यावेळी समारोपप्रसंगी दयानंद महाराज यांनी मुलींना भरपूर शिकवा पौष्टिक आहार द्या आपली मुलगी शारीरिक दृष्ट्या कमजोर व तगड्या बनवा कुणाचीच वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही अशा पद्धतीने शरीरवृष्टी मुलींची बनवा. असे भावनिक उद्गगार देखील दयानंद महाराज यांनी व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुराधाताई नागवडे; नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस; प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष आबासाहेब जगताप विजय नागवडे; काशिनाथ पारखे; नगरसेवक प्रशांत गोरे आदींनी यावेळी श्रद्धांजली अर्पण केली.
या कार्यक्रमास आमदार विक्रम पाचपुते; जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुराधाताई नागवडे; कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस; माजी सरपंच विठ्ठलरव नागवडे; नागवडे कारखान्याचे संचालक सुभाषराव शिंदे; श्रीनिवास घाडगे; दादासाहेब नेटके; प्रशांत दरेकर; विठ्ठल जंगले; मारुती पाचपुते; विश्वनाथ गिरमकर प्रवीण कुरुमकर; सरपंच प्रमोद शिंदे; भाजपाचे तालुका अध्यक्ष संदीप नागवडे; ज्येष्ठ पत्रकार संजय काटे; नंदकुमार कुरुमकर; चेअरमन राजाभाऊ नागवडे; सरपंच संजय काका नागवडे; रामचंद्र नागवडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन बापूराव कांबळे यांनी केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष