By : Polticalface Team ,05-04-2025
लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील तालुक्याची उपराजधानी समजल्या जाणाऱ्या वांगदरी येथील ग्रामदैवत अंबिका माता या ग्रामदैवतेचा यात्रा उत्सव सालाबाद प्रमाणे यावर्षी 2 ते ३ एप्रिल२०२५ रोजी यात्रोत्सव मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आल्याची माहिती गावचे सरपंच संजय काका नागवडे यांनी दिली.
या यात्रोत्सवाची अधिक माहिती देताना सरपंच संजय नागवडे यांनी सांगितले की; यात्रेच्या पहिल्या दिवशी बुधवार दिनांक २ एप्रिल 2025 रोजी अंबिका मातेची विधिवत अभिषेक व महाआरती ने यात्रेची सुरवात करण्यात आली त्यामध्ये रात्री छबीना मिरवणूक डोळ्याचे पारणे फेडावे अशाप्रकारे नियोजन करण्यात आले. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी गुरुवार दिनांक ३ एप्रिल 2025 रोजी मल्लांसाठी यात्रा कमिटीने कुस्ती आखाड्याचे भव्य असे आयोजन करण्यात आले होते. या आखाड्यामध्ये. तालुक्यातील आणि बाहेरील पहिलवानांनी मोठा सहभाग नोंदवला आखाड्याचा शेवट अकरा हजार रुपये बिदागी देऊन आखाड्याची सांगता करण्यात आली. विशेष म्हणजे वजनावर कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. पुढे आणखी माहिती देताना सरपंच नागवडे यांनी सांगितले की वजन करण्यासाठी ताटाकेश्वर मंदिरात व्यवस्था करण्यात आली होती. यात्रेमध्ये कुठलाही अनुचित प्रकार न घडता यात्रा सुरक्षित व शांततेच्या वातावरणात पार करण्यात आली. यात्रा सुरक्षित पार पाडण्यासाठी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे; माजी सरपंच विठ्ठलराव आप्पा नागवडे; दीपक शेठ नागवडे; आदेश शेठ नागवडे; युवा नेते दिग्विजय नागवडे; सरपंच संजय काका नागवडे; उपसरपंच दिलीप मासाळ; काशिनाथ पारखे; महेश शेठ नागवडे; चेअरमन राजेंद्र नागवडे; ग्रामपंचायत माजी सदस्य किसन मासाळ; सर्जेराव मासाळ; भाऊसाहेब राऊत; मधुकाका नागवडे; विकास आढागळे; जनार्धन चोरमले; तुषार नागवडे; विजय नागवडे; पठ्ठे बापूराव नागवडे; बापूराव कांबळे; पांडुरंग नागवडे; पोपटराव राऊत; अनिल फराटे; बंटी दादा नागवडे; पप्पू काटे; दत्तात्रय भुजबळ; सावळा भाऊ चोरमले; किसन कलगुंडे; झुंबरराव हंडाळ; रोहिदास नागवडे; मा पोलीस पाटील सुभाष गोरे; रामचंद्र नागवडे; साहेबराव महानवर; दगडू आप्पा सोनलकर; हे शिक्षक नेते आबासाहेब जगताप; मा उपसरपंच शिवाजी चोरमले दत्तात्रय मासाळ यांच्यासह यात्रा कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यात्रा सुरक्षित व शांततेत पार पाडण्यासाठी मोठे परिश्रम घेतले. या यात्रा उत्सवाच्या कालावधीत अहवाल वृद्ध महिला भगिनींनी अंबिका मातेला साक्षात दंडवत घालत रांगेत सर्वांनी दर्शनाचा लाभ घेतला
यात्रा निमित्त येणाऱ्या भाविकांचे यात्रा कमिटी अध्यक्ष; उपाध्यक्ष; विश्वस्त, सरपंच,उपसरपंच; सदस्य, चेअरमन व्हा.चेअरमन संचालक, पाणी वापर संस्था चेअरमन संचालक, आदींनी यात्रा सुरक्षितेसाठी बहुमोल वेळ देऊन योगदान दिले यात्रा सुरक्षित व शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल सरपंच संजय काका नागवडे यांनी सर्वांचे आभार मानले .
वाचक क्रमांक :