By : Polticalface Team ,05-04-2025
लिंपणगाव( प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्याचे जेष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर हे सामान्य व्यक्तींचे आधारवड असून; एक कणखर व निर्भीड पत्रकार म्हणून त्यांची संपूर्ण जिल्ह्यात ओळख असल्याचे गौरवोद्गार प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आबासाहेब जगताप यांनी आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी येथील अंबिका मातेच्या यात्रा उत्सवाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या आढावा बैठकीत पत्रकार कुरुमकर यांना दैनिक राष्ट्र समूहाने उत्कृष्ट ग्रामीण पुरस्कृत केल्याबद्दल गावच्या वतीने त्यांचा यानिमित्ताने नागरी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे; जेष्ठ नेते व गावचे माजी सरपंच विठ्ठलराव आप्पा नागवडे; गावचे सरपंच संजय काका नागवडे; यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सोहळ्यास उपसरपंच काशिनाथ पारखे; चेअरमन राजेंद्र नागवडे; आदेशशेठ नागवडे; युवा नेते दिग्विजय नागवडे; महेशशेठ नागवडे मा. चेअरमन काशिनाथ पारखे; रामचंद्र नागवडे; रोहिदास नागवडे; साहेबराव महारनवर; दगडू आप्पा सोनलकर; प्राथमिकचे शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आबासाहेब जगताप; माध्यमिक सोसायटीचे संचालक आप्पासाहेब जगताप; मा उपसरपंच. शिवाजी चोरमले; दत्तात्रेय मासाळ; आदी पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविकपर भाषणात राष्ट्रीय अध्यक्ष आबासाहेब जगताप यावेळी म्हणाले की; पत्रकार हे श्रीगोंद्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी दिवंगत शिवाजीराव नागवडे बापूंच्या विचारसरणीतून तयार झालेले हे व्यक्तिमत्व आहे. चौथा स्तंभ म्हणून आज पत्रकारांकडे पाहिले जाते. त्यामध्ये न्याय व्यवस्थेपैकी चौथ्या स्तंभाची देखील देशाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका असते. त्या पार्श्वभूमीवर पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांनी चौथ्या स्तंभाच्या चौकटीत राहून पत्रकारितेचे अस्त्र हे सर्वसामान्यांच्या हितासाठी वापरले. त्यातून तालुक्यातील रस्ते; वीज; पाणी; या प्रश्नांसाठी निर्भीडपणे लिखाण करत आहेत त्यातून अनेक प्रश्न मार्गी लागत आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचे देखील ज्वलंत प्रश्न या प्रलंबित प्रश्नांसाठी रात्रंदिवस लिखाण करून प्रत्येकाला पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. पत्रकार कुरुमकर हे अदृश्य अशी शक्ती आहे. एक अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख देखील आहे.
असे सांगून श्री जगताप आणखी पुढे म्हणाले की; काही दिवसापूर्वी आमच्या इनामगाव ते वांगदरी या रस्त्याचे काम चालू असताना अचानक बंद पडले. त्यांना ती माहिती समजली. त्याची पत्रकार कुरुमकर यांनी सखोल माहिती घेतली. बातमी प्रसिद्ध होताच या बातमीची संबंधितांनी तातडीने धास्ती घेतली. आणि दोनच दिवसांमध्ये रस्त्याचे काम पुन्हा सुरू झाले. अशा या दूरदृष्टी लाभलेले पत्रकार कुरुमकर यांना तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात उत्तम बातमी लेखन केल्याबद्दल त्यांना दैनिक राष्ट्र सह्याद्री समूहाने देखील पुरस्कृत करून त्यांचा सन्मान केला आहे. अशा या गुणवंत व बुद्धिवंत पत्रकारांचा सन्मान करणे हे आपले सर्वांचे आद्य कर्तव्य असल्याचे श्री जगताप यांनी यावेळी सांगून पुरस्कार प्राप्त पत्रकार कुरुमकर यांना वांगदरी गावच्या वतीने पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या. आभार सरपंच संजय काका नागवडे यांनी मानले.
वाचक क्रमांक :