शिवपानंद समितीचे समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या मध्यस्थीने खरातवाडीच्या ग्रामस्थांची उपोषण मागे

By : Polticalface Team ,08-04-2025

शिवपानंद समितीचे समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या मध्यस्थीने खरातवाडीच्या ग्रामस्थांची उपोषण मागे लिंपणगाव( प्रतिनिधी) शेत रस्ते शिवपानंद समितीचे समन्वयक दादासाहेब जंगले पाटील व तालुका प्रशासन यांच्या मदतीने खरातवाडीच्या ग्रामस्थांनी उपोषण योग्य तोडगा काढून अखेर मागे घेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार मौजे खरातवाडी तालुका श्रीगोंदा येथील ग्रामस्थांनी इतर जिल्हा मार्ग 202 घारगाव खरातवाडी एरंडोली हा खरातवाडी गावातील संत तुळशीदास मंदिरा पाठीमागील नदीपात्रामध्ये बंधाऱ्याचे पाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात आल्यानंतर ग्रामस्थानी नदीपात्रातील शासकीय जागेत दगड; गोटे टाकून रस्त्यावरून जाताना होणारी गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न केला असता; श्री पोपट कोंडीबा इथापे यांनी त्या नदीपात्रातील शासकीय जागेवर दगड गोटे पांगवू नये. अशी ताकीत दिल्यानंतर ग्रामस्थ विद्यार्थी जनावरे यांना नदीमधून गावामध्ये येण्यासाठी अडचण निर्माण होऊ लागली, अत्यावश्यक सुविधा बंद झाल्या. अशावेळी ग्रामस्थांनी तहसील कार्यालय; श्रीगोंदा भूमी अभिलेख कार्यालय श्रीगोंदा; सार्वजनिक बांधकाम विभाग; पंचायत समिती श्रीगोंदा; कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक-2 श्रीगोंदा, जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर, महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य, यांचेकडे सदर रस्ता खुला करणे बाबत व मोजणी करणेबाबत लेखी पत्र दिले असता त्यावर कुठल्याही प्रकारची दखल प्रशासनाने 15 दिवस घेतली नसल्यामुळे आज सोमवार रोजी खरातवाडी येथील त्रस्त ग्रामस्थांनी आमरण उपोषण करण्याचा पवित्रा घेतला असताना ग्रामस्थांची भावना, ग्रामस्थांना होणारा त्रास लक्षात घेऊन दादासाहेब जंगले राज्य समन्वयक शेत रस्ते शिव पानंद समिती यांनी भूमी अभिलेख कार्यालय श्रीगोंदा तहसील कार्यालय श्रीगोंदा यांच्या मदतीने इजिमा 132 पासून पिंपळगांव पिसा खरातवाडी बेलवंडी या शासकीय रस्त्यापासून इजीमा 202 खरातवाडी ते एरंडोली हा रस्ता मोजणी करण्यासाठी सर्व विभागांची परवानगी घेऊन बुधवार दिनांक 9 एप्रिल 2025 रोजी मोजणी करण्याचे लेखी आश्वासन तहसील कार्यालय श्रीगोंदा, भूमी अभिलेख कार्यालय श्रीगोंदा, सार्वजनिक बांधकाम विभाग पंचायत समिती श्रीगोंदा, यांचे माध्यमातून उपोषण सोडण्यासाठी दादासाहेब जंगले पाटील ऍडव्होकेट जी बी कडूस पाटील,प्रभारी तहसीलदार प्रवीण मगदुल, नायब तहसीलदार जाधव , उपअधीक्षक भुमिअभिलेख सुहास जाधव साहेब, निमतानदार वासुदेव पाटील यांनी लाख मोलाचे सहकार्य करत योग्य तोडगा काढला. या उपोषणात खरातवाडी येथील लहान मुले विद्यार्थी पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. : * प्रभारी तहसीलदार प्रवीण मगदुल यांनी चवळीच्या पाठपुरामुळे पुढील १४ गावांची मोजणीचे आदेश काढण्यात आले. दरम्यान राज्यात शेत रस्ते शिवपानंद समितीचे प्रणेते शरदराव पवळे व राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यात दिशादर्शक असे शेत रस्त्याचे वर्षानुवर्षे रखडलेले प्रश्न मार्गी लागत आहेत. त्यामध्ये श्रीगोंदा तालुका हा राज्याला दिशादर्शक असा रोड मॉडेल बनवण्याचा ऐतिहासिक निर्णय होताना दिसत आहे. श्रीगोंद्याच्या तात्कालीन तहसीलदार डॉ क्षितिजा वाघमारे यांनी तालुक्यातील अडचणीचे शिव व शेत रस्ते मोकळे करण्याचा संकल्प हाती घेतला होता. त्यातून संपूर्ण राज्याला योग्य अशी दिशा मिळत आहे. या कामी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील प्रशासन या कामी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी देखील स्वतःहून पुढे येण्याची गरज असून; वर्षानुवर्षे रखडलेले शिव रस्ते; शेत रस्ते मोकळे होणार आहे. असे मत राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.