सभासदांचा हक्क, की कारखान्याचा सौदा?- आमदार नारायण (आबा) पाटील

By : Polticalface Team ,10-04-2025

सभासदांचा हक्क, की कारखान्याचा सौदा?- आमदार नारायण (आबा) पाटील

जेऊर प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करंजे येथे पार पडलेल्या प्रचार सभेत आमदार नारायण (आबा) पाटील यांनी भावनिक आणि थेट शब्दांत आपली भूमिका मांडली. सहकार तत्वांची जपणूक करणारा "श्री आदिनाथ साखर कारखाना" भाडे तत्वावर देण्याचा प्रकार समोर येताच त्यांनी याला तीव्र विरोध दर्शवला आणि संपूर्ण ताकदीने हा प्रस्ताव हाणून पाडल्याचे जाहीर केले.

"खाजगी व्यक्तींना सहकाराचा आत्मा कधीच कळणार नाही," असे ठाम मत व्यक्त करत त्यांनी सभासदांना भावनिक साद घातली – "कारखाना तुमचा आहे, तुमच्या हक्कांची रक्षा करण्याची वेळ आता आली आहे. संजिवनी पॅनल हा हक्काचा लढा लढण्यासाठी तयार आहे."

सभेच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच दादासाहेब सरडे होते. व्यासपीठावर कृषीभूषण नामदेवराव साबळे, अतुलभाऊ पाटील, अंकुश शिंदे, बाळासाहेब सरडे, श्रीराम सुखसे, जयद्रथ शिंदे, डॉ. पांडुरंग हजारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आमदार आबा पाटील म्हणाले, “आदिनाथ कारखाना हा सभासदांचा आहे. गटबाजी संपवा, अन्यथा कारखाना अडचणीत येईल. निधी उपलब्ध करून देणे माझे काम, तुमचा विश्वास आमच्यावर ठेवा.” सभासदांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या भाषणाला प्रतिसाद दिला.

या सभेस करंजे, भालेवाडी, करमाळा, गौंडरे, निमगाव, कोळगाव यांसारख्या गावांतून आलेले हजारो सभासद उपस्थित होते. सभा उर्जित वातावरणात संपन्न झाली.

"आता हक्काची लढाई, कारखाना वाचवायचा!" – ही घोषणा सभेत अखेरपर्यंत घुमत राहिली.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी