जुन्या लोकांनी उभारलेल्या संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी निवडणूक लढवत आहोत; मतदार कपबशीसमोरच शिक्का मारतील – आमदार नारायण आबा पाटील यांची वांगीतील जाहीर सभेत घोषणा

By : Polticalface Team ,11-04-2025

जुन्या लोकांनी उभारलेल्या संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी निवडणूक लढवत आहोत; मतदार कपबशीसमोरच शिक्का मारतील – आमदार नारायण आबा पाटील यांची वांगीतील जाहीर सभेत घोषणा

  • जेऊर प्रतिनिधी: जुन्या लोकांनी उभारलेल्या संस्थेस गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी निवडणूक लढवत असून मतदार कपबशी समोरच शिक्का मारतील, असा विश्वास आमदार नारायण आबा पाटील यांनी व्यक्त केला. वांगी नं. ३ येथील सभेत ते बोलत होते.

श्री आदिनाथ कारखाना संजीवनी पॅनलच्या प्रचाराची सभा वांगी नं. ३ येथे पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सुधीरमाऊ रोकडे होते. व्यासपीठावर करमाळा नगरपरीषदेचे नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, पांडूरंग देशमुख, जि.प. अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, दत्तात्रय आरकीले, माजी सभापती गहीणीनाथ ननवरे, दीपक देशमुख, अजितदादा तळेकर, पोपटदादा सातव, माजी संचालक बापूराव आणा देशमुख, देवानंद बागल, नानासाहेब गोडगे, दत्तात्रय बापू रणसिंग, विशाल तकीक, शेखर तात्या गाडे, धनंजय गायकवाड, विकास गलांडे (सरपंच), मामा सांगावे, मौलाभाई मुलाणी (सरपंच), तानाजी देशमुख, गणेश चौधरी, राव काका देशमुख, नितिनदादा हिवरे, दंसू बापू देशमुख, विहुल शेळके, हिरा चौगुले, विकास अमृळे, विनोद गरड, श्रीहरी कदम, अखलाख जहागीरदार, गणेश जाधव, बाबूदादा रोकडे, अमर आरकीले, भुजंगराव जाधव, बापूराव आरकीले, धनूबापू निंबाळकर, गणेश पाटील, बाबूभाई जहागिरदार, अर्जुन आबा तकीक, वैभव पाटील, भाऊसाहेब तावसे, विकास पाटील, अशोक वाघमोडे, गोपाळ रोकडे, बापू गोडसे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार नारायण आबा पाटील म्हणाले की, सभासदांनी स्वतःचा मालकी हक्क टिकवून ठेवण्यासाठी ही निवडणूक हाती घ्यावी. उजनी परिसरातील वीज, पाणी व रस्ते याबाबतीत मी कधीही कमी पडलो नाही. या भागातील शेतकऱ्यांना शेतीपूरक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ज्या पदावर असो, त्या पदावरून न्याय दिला आहे. त्यामुळे सभासद मतदार आमच्या पॅनलला विश्वासाने मतदान करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तर, मोहिते पाटील व आमच्यात विकासकामांबाबत एकवाक्यता होती, असे सांगून करमाळा नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, "जगताप कुटुंबातील सदस्यांवर तालुक्याने अनेक वर्षे विश्वास ठेवला आहे. माझे आजोबा, देशभक्त स्वातंत्र्यसैनिक माजी आमदार नामदेवराव जगताप व वडील माजी आमदार जयवंतराव जगताप साहेब यांनी भविष्याचा विचार करून अनेक कामे केली. यामध्ये उजनी, कुकडी पासून अनेक प्रकल्प आहेत. आज आमदार म्हणून जनता नारायण आबांवर प्रेम करते आणि त्यांनी विकासकामात कुठेही कसूर केली नाही."

आदिनाथ कारखान्यास गतवैभव मिळवून देण्यासाठी आम्ही नारायण आबांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत, असेही जगताप यांनी सांगितले.

प्रास्ताविक महेंद्र पाटील यांनी केले. यावेळी बापूराव देशमुख, देवानंद बागल, पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर आदींची भाषणे झाली. उपस्थितांचे आभार नाना गोडगे यांनी मानले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष