पत्रकार कुरुमकर यांचा कानिफनाथ व लिंगाळेश्वर देवस्थान ट्रस्टकडून सन्मान

By : Polticalface Team ,12-04-2025

पत्रकार कुरुमकर यांचा कानिफनाथ व लिंगाळेश्वर देवस्थान ट्रस्टकडून सन्मान लिंपणगाव (प्रतिनिधी )-श्रीगोंदा तालुक्यातील ज्येष्ठ व अभ्यासू पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांचा हनुमान जयंती शुभमुहूर्तावर श्रीगोंदा फॅक्टरी येथील जागृत देवस्थान लिंगाळेश्वर देवस्थान ट्रस्ट व कानिफनाथ देवस्थानकडून यथोचित असा आदरपूर्वक सन्मान करण्यात आला. यावेळी कानिफनाथ देवस्थानचे विश्वस्त व शिवपानंद शेत चळवळीचे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील व ज्येष्ठ ह भ प गाडेकर महाराज यांनी पत्रकार कुरुमकर यांना नुकताच अहिल्यानगर जिल्ह्यातील दैनिक राष्ट्र सह्याद्री समूहाकडून ग्रामीण भागातील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मान करण्यात आला यांच्या सत्कार्याला उजाळा मिळण्यासाठी. श्रीगोंदा फॅक्टरी येथील जागृत देवस्थान लिंगाळेश्वर देवस्थान व कानिफनाथ देवस्थान यांच्याकडून कानिफनाथ मंदिरामध्ये ह भ प गाडेकर महाराज यांनी सन्मान केला तर लिंगाळेश्वर मंदिरात बापूराव जंगले पाटील यांनी मंदिरामध्ये पत्रकार कुरुमकर यांना आमंत्रित करून यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यावेळी म्हणाले की; ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर हे आमच्या लिंपणगावचे भूमिपुत्र आहेत. त्यांचे पत्रकारितेतील कार्य जिल्ह्यात आदर्शवत असे काम आहे. त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वांशी मोठे मैत्रीपूर्ण संबंध जोपासले आहेत. त्यांची प्रत्येक बातमी ही सखोल व सर्वसामान्यांच्या हिताची असते. राज्यात सध्या शिव व शेत रस्ते चळवळीच्या माध्यमातून अनेक वर्षानुवर्ष रखडलेले बंद शिव; शेत रस्ते खुले करण्याची मोहीम तालुका प्रशासनाने हाती घेतली आहे. त्यामध्ये श्रीगोंदा तालुका हा राज्यात रोड मॉडेल बनवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. या चळवळीला उत्तम प्रकारे पत्रकार कुरुमकर यांनी प्रसिद्धी देऊन आमच्या पाठीमागे मोठी ताकद निर्माण केली आहे. तालुका प्रशासनाला देखील त्यांच्या लेखणीची दखल घ्यावी लागते. त्यांचे पत्रकारितेतील कार्य निश्चितच प्रेरणादायी व दिशादर्शक असून पत्रकार कुरुमकर यांना पत्रकारितेच्या माध्यमातून जागृत देवस्थान कानिफनाथ महाराज व लिंगाळेश्वर महाराज यापुढेही निश्चितपणे सद विवेक शक्ती; बुद्धी व सामर्थ्य देईल असे सांगून पत्रकार कुरुमकर यांना पुढील कार्यास जंगले पाटील यांनी दोन्हीही देवस्थानच्या वतीने पत्रकार कुरुमकर यांना शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी लिंगाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे गुरव प्रशांत राऊत; युवक कार्यकर्ते अशोक वाल्हेकर; मिठूशेठ लाळगे यांच्यासह भक्तगण उपस्थित होते. आभार लिंगाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे बापूराव पाटील जंगले यांनी आभार मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.

देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.