By : Polticalface Team ,13-04-2025
लिंपणगाव (प्रतिनिधी) जीवन जगत असताना खूप काही विचार करावा. परंतु दीर्घायुष्य जगण्यासाठी गुरुंनी दिलेल्या संस्कार व विचाराची सांगड घालावी निश्चितपणे जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही; असे प्रतिपादन मा. प्राचार्य बाळासाहेब शेंडे यांनी व्यक्त केले.
श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ विद्यालयाच्या सन २०१२-१३ या एसएससी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी मा. प्राचार्य बाळासाहेब शेंडे हे होते. मेळाव्याच्या प्रारंभी ज्यांनी ज्ञानदान करून जीवनाला दिशा दिली; संस्काराचे व ज्ञानाचे धडे दिले अशा गुरुजनांचा माजी विद्यार्थ्यांनी स्वागत करून सन्मानित केले.
या कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य ए एल पुराणे मा. प्राचार्य बाळासाहेब शेंडे; मा प्राचार्य आदिनाथ पाचपुते; प्रा पुष्पलता पाचपुते, मुख्याध्यापक बाळासाहेब जठार; रवींद्र झुंजार; एम पी खेडकर; बाळासाहेब मांडे; शिवाजी इथापे; प्रा. निसार शेख; श्रीमती नौशाद शेख; पत्रकार नंदकुमार कुरुमकर; एकनाथ नेटवटे आदी आजी-माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी मा विद्यार्थी ज्ञानदेव नगरे; राहुल काकडे; पूनम खोमणे; सुभाष गरुड आदींनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
याप्रसंगी माजी विद्यार्थी शुभम काकडे यावेळी बोलताना म्हणाले की; शालेय जीवनात शिक्षकांकडून आम्हाला उत्तम प्रकारे शिक्षण; संस्कार; शिस्त अंगी मिळाली. त्यांच्यामुळेच आमच्या जीवनाला योग्य दिशा मिळाली. आता आम्ही विविध क्षेत्रात उच्च पदावर सेवेत आहोत. हे केवळ गुरु व आई-वडिलांच्या कृपेमुळेच आमचे करिअर घडल्याचे आवर्जून सांगितले.
यावेळी ज्येष्ठ शिक्षक शिवाजी इथापे म्हणाले की; विद्यार्थी आनंदी दिसला की; आमच्याही चेहऱ्यावर आनंद द्विगुणित होतो. उज्वल भविष्यासाठी आयुष्यामध्ये मार्गस्थ होत असताना प्रत्येकाने जिद्द ठेवावी. त्यामध्ये आई-वडील व शिक्षकांना मात्र जीवनात विसरता कामा नये असा सल्ला दिला.
यावेळी मुख्याध्यापक बाळासाहेब जठार आपल्या शुभेच्छा पर भाषणात म्हणाले की; शालेय जीवनात माध्यमिक स्तरावरील जीवन कधीही विद्यार्थ्यांनी विसरता कामा नये. 13 वर्षांपूर्वीची विद्यार्थी गाळाभेट विद्यार्थ्यांनी घडून आणली. हा एक दुग्ध शर्करा योग आहे. माजी विद्यार्थ्यांनी गुरु शिष्याची गळाभेट घडवून आणल्यामुळे आम्हालाही ऊर्जा प्राप्त झाली. पुढील दीर्घायुष्यामध्ये वाटचाल करताना नियत; विचार व कुटुंबातील संस्कार प्रत्येकाने जतन करावेत. असे सांगून श्री जठार यांनी माजी विद्यार्थ्यांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
मा प्राचार्य आदिनाथ पाचपुते यावेळी म्हणाले की; आत्ताची शिक्षण पद्धती ही तकलादू आहे. पूर्वीची शिक्षण पद्धत आणि आताच्या शिक्षण पद्धतीमध्ये आमुलाग्रह बदल झालेला दिसतो. विद्यार्थ्यांनी जीवनात जे क्षेत्र निवडले. त्या क्षेत्राशी प्रामाणिक राहण्याचा सल्ला श्री पाचपुते यांनी यावेळी दिला.
अध्यक्षीय भाषणात मा. प्राचार्य बाळासाहेब शेंडे यावेळी म्हणाले की; प्रत्येकाने स्वतःचे करिअर घडवण्यासाठी चांगले मित्र व संस्कारावर आपले करिअर अवलंबून असते. त्यासाठी अलीकडे चांगले मित्र आवश्यक आहेत. धार्मिक क्षेत्रातून देखील आपले चांगले संस्कार घडतात. जीवन हे क्षणभंगुर आहे. वामनराव पै यांच्या सल्ल्यानुसार तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार यानुसार आपण आपल्या आयुष्याची योग्य दिशा व वाटचाल करावी असे सांगून माजी विद्यार्थ्यांना शेंडे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
स्नेहमेळावा यशस्वी होण्यासाठी इरफान तांबोळी; शुभम लाटे; मयूर जगताप; सय्यद सद्दाम; संदीप क्षीरसागर; भरत कांबळे आदींसह माजी विद्यार्थ्यांनी मोठे परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन पूनम खोमणे व अभिजीत जठार यांनी केले. तर आभार अक्षय गायकवाड यांनी मानले.
वाचक क्रमांक :