पत्रकार कुरुमकर व प्राचार्य खेडकर यांचा पत्रकार संघाकडून सन्मान

By : Polticalface Team ,17-04-2025

पत्रकार कुरुमकर व प्राचार्य खेडकर यांचा पत्रकार संघाकडून सन्मान

लिंपणगाव( प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांना दैनिक राष्ट्र सह्याद्री समूहाकडून नुकताच ग्रामीणचा उत्कृष्ट पुरस्कार देऊन राष्ट्र सह्याद्रीने समूहाने सन्मान केल्याबद्दल तसेच बेलवंडी येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री राजेंद्र खेडकर यांना नुकतीच रयत शिक्षण संस्थेने पदोन्नती दिल्याबद्दल या दोन्हीही मान्यवरांचा पत्रकार संघाचे अध्यक्ष माधव बनसोडे व सचिव डॉ अमोल झेंडे यांनी श्रीगोंदा येथे सन्मान केला.

       यावेळी शुभेच्छापर भाषणात पत्रकार संघाचे अध्यक्ष माधव बनसोडे म्हणाले की; ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर हे आमचे परममित्र व पत्रकारिता क्षेत्रातील अनुभवी व मार्गदर्शक म्हणून आहेत त्यांचे पत्रकार संघाला देखील मौलिक असे मार्गदर्शन मिळत आहे. कुरुमकर यांनी आपल्या पत्रकारिता क्षेत्रात जवळपास 27 वर्ष  योगदान दिले आहे. समाजाच्या प्रलंबित प्रश्नासाठी कुरुमकर यांनी आपल्या पत्रकारितेचा उत्तम लेखणीतून एक वेगळा ठसा उमटल्याचे सांगून श्री बनसोडे यांनी पत्रकार कुरुमकर व प्राचार्य खेडकर  यांना पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या.

        यावेळी शुभेच्छा देताना पत्रकार संघाचे सचिव डॉ अमोल झेंडे यावेळी म्हणाले की; प्राचार्य राजेंद्र खेडकर व ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांचे शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील कार्य अत्यंत प्रभावी असून; ज्ञानदानाच्या कार्यात या दोन्हीही सन्मानअर्थींचा प्रत्येक शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडींमध्ये सहभाग असतो. या दोन्ही मान्यवरांना श्री झेंडे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी पत्रकार संघाचे वैभव हराळ; पत्रकार पिटर रणसिंग आदी यावेळी उपस्थित होते.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी