तब्बल पंचवीस वर्षानंतर लिंपणगाव ते नागवडे कारखाना रेल्वे गेट नजीक रस्त्याने घेतला मोकळा श्वास

By : Polticalface Team ,17-04-2025

तब्बल पंचवीस वर्षानंतर लिंपणगाव ते नागवडे कारखाना रेल्वे गेट नजीक रस्त्याने घेतला मोकळा श्वास

लिंपणगाव (प्रतिनिधी )-श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव ते सहकार महर्षी नागवडे कारखाना रेल्वे गेटकडे मार्गस्थ होणारा अकराशे मीटर लांबीच्या नादुरुस्त रस्त्याचे मागील आठवड्यात खडीकरण करून उत्तम प्रकारे डांबरीकरण करण्यात आले. तब्बल 25 वर्षानंतर लिंपणगाव ते नागवडे कारखाना रेल्वे गेट नजीक रस्त्याचे प्रलंबित काम संबंधित ठेकेदाराने उत्तम प्रकारे डांबरीकरणाचे काम मार्गी लावल्याने लिंपणगावच्या ग्रामस्थांसह सभासद; कामगार; ऊस उत्पादक व वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

   दरम्यान लिंपणगाव ते नागवडे कारखाना रेल्वे गेट रस्त्याची गेल्या पंचवीस वर्षापासून मोठी दुरावस्था निर्माण झाली होती. या रस्त्यातून पायी चालणे देखील अत्यंत जिकिरीचे बनले होते. त्यामध्ये गाळप हंगामात वाहन चालकांना ऊस वाहतूक करताना जीव मुठीत धरूनच वाहने चालवावी लागत होती. त्यामध्ये रस्त्याच्या मध्यभागी गोलाकाराचे जवळपास अडीच ते तीन फूट खोल खड्डे पडल्यामुळे रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट बनली होती. त्यामध्ये रात्री अपरात्री ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना मोठ्या अपघाताला सामोरे जाण्याची वेळ येऊन ठेपली होती. अशा या परिस्थितीत ऊस वाहतूक करणारे वाहन चालक सभासद कामगार इत्यादींना या रस्त्यातून जाताना अक्षरशा मणक्याचे आजार होत गेले. अनेकांना अपघातामुळे अपंगत्व देखील आले. परंतु या रस्त्याच्या दुरुस्तीकडे मात्र संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हणावे तसे लक्ष दिले नाही. फक्त वरवर खड्डे बुजवण्याचेच काम केले. परंतु पावसाळ्यामध्ये पुन्हा रस्त्याची जैसे थी अवस्था होऊन रस्ता पुन्हा खड्डेमय बनला. व अपघाताला पुन्हा निमंत्रण मिळू लागले. रस्ता दुरुस्तीसाठी अनेक वेळा ग्रामस्थांनी या रस्त्याच्या खड्ड्यावर दुरुस्ती व्हावी म्हणून सत्यनारायण पूजा व जागरण गोंधळ देखील घातले. परंतु तरीदेखील जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला कसल्याही प्रकारची जाग आली नाही. सदर रस्ता हा यापूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे समाविष्ट होता रस्ता दुरुस्तीची जबाबदारी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचीच होती. परंतु अपुऱ्या निधीचे कारण दाखवून जवळपास लिंपणगाव ते नागवडे कारखाना रेल्वे गेट हा पंधराशे मीटरचा रस्ता 25 वर्ष दुरुस्ती पासून जिल्हा परिषदेने प्रलंबित ठेवला होता. त्यामुळे या रस्त्यातून प्रवास हा सर्वांचाच जीव घेणा ठरला होता.  या रस्त्यातून सहकारी साखर कारखानदारी असल्याने दळणवळण देखील मोठ्या प्रमाणावर दररोज होत आहे. याचे भानही जिल्हा परिषद च्या बांधकाम विभागाला राहिले नाही. 


        सदर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांनी गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची वेळोवेळी पार्श्वभूमी मांडून दळणवळणाचा रस्ता दुरुस्त करण्यासाठी प्रसिद्धीच्या झोतात आणला. जिल्हा परिषद बांधकाम विभाग श्रीगोंदा यांनाही वेळोवेळी निवेदन देऊन

 या रस्त्याची प्रसिद्धीद्वारे दुरुस्तीची मागणी देखील केली होती. परंतु पत्रकार कुरुमकर यांना संबंधित जिल्हा परिषदेचे अधिकारी हे सदर रस्त्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला आहे. निधीआल्यानंतर दुरुस्ती करू. एवढेच उत्तर द्यायचे. परंतु त्याच्यावर पत्रकार कुरुमकर थांबले नाही. रस्ता दुरुस्तीचा पाठपुरावा मात्र पत्रकार कुरुमकर यांनी सोडलाच नाही. अखेर जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांना कुरुमकर  यांनी तुमच्या बांधकाम विभागाला जर निधी उपलब्ध होत नसेल तर हा रस्ता पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याच्या सूचना संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभाग उपाभियंता यांच्याकडे केल्या. आणि अखेर संमती मिळाली‌. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सदर रस्ता पुन्हा हस्तांतरित झाला. आता या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तब्बल 1100 मीटर नादुरुस्त रस्त्याला शासन स्तरावरून एक कोटीचा निधी उपलब्ध करून रस्त्याचे उत्तम प्रकारे मजबुतीकरण व डांबरीकरण झाले आहे आता या रस्त्याने पूर्णतः मोकळा श्वास घेतला. परंतु पुढे अडीचशे मीटर रस्ता मात्र दुरुस्तीच्या प्रतीक्षेतच राहिला तो देखील बांधकाम विभागाचे अधिकारी दुरुस्त करतील असा विश्वास देखील पत्रकार कुरुमकर यांनी व्यक्त केला आहे. आता या रस्त्याचे उत्तम प्रकारे मजबुतीकरण व डांबरीकरण झाले या कामे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री होके साहेब यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मोठे परिश्रम घेतले. तर जोपर्यंत रस्त्याची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांनीही वेळोवेळी प्रसिद्धी देऊन प्रशासनाला या रस्त्याची दुरुस्ती करण्यास भाग पाडले. त्यामुळे पत्रकार कुरुमकर यांचेही वाहन चालक; कामगार; सभासद; ऊस उत्पादक व प्रवाशांनी अभिनंदन केले आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.