By : Polticalface Team ,20-04-2025
                           
              लिंपणगाव ( प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने शेतरस्त्यांच्या प्रश्नांवर आझाद मैदानावर दि.२१,२२ एप्रिलला राज्यभरातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या धरणे व जलत्याग आंदोलनाची मा. महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयामध्ये शिव पानंद चळवळीच्या शेतरस्त्यांच्या प्रश्नावरील  मांगण्याच्या संदर्भात प्रमुख पदाधिकाऱ्यांची दि.२४ एप्रिलला बैठक आयोजित करण्यात आली असुन यांसदर्भात महसुलचा स्वतंत्र शासन निर्णय बनवण्यासंदर्भात चळवळीच्या वतीने सरकारला सकारात्मक प्रतिसाद देत आझाद मैदनावरील राज्यव्यापी आंदोलन तात्पुरते स्थगित करून सरकारशी चर्चा करून आपल्या मागण्या शासननिर्णयात घेण्यासाठी आम्ही आग्रही राहू शेवटच्या शेतकऱ्याला दर्जेदार शेतरस्ता मिळून देण्यासाठी आग्रही राहून शिव पानंद शेतरस्ते, गाडीमार्ग, पायमार्ग, वहिवाटीचे रस्ते आदी नकाशावरील शेतरस्त्यांसह तहसिल प्रांत कार्यालयातील प्रलंबित शेतरस्ता केसेस यासंदर्भात विशेष कालावधी मुदत जाहीर करून शेतरस्त्यांच्या हद्द निश्चिती, नकाशावर लांबी रुंदी, दगड नंबरी, शेतरस्ता नंबरींग , ग्रामशेतरस्ता समिती स्थापना,यांसह मोजणी शुल्क संरक्षण फी संदर्भात विशेष निर्णय आदी मागण्या शासनिर्णयात घेण्यात चळवळ आग्रही राहील तरी राज्यभरातीत तमाम शेतकरी बांधव, वृत्त पत्र इले. मिडीयातील पत्रकार बांधवांनी दिलेल्या पाठबळामुळे आज सरकारने सकारात्मक भुमिका घेतली असुन महसुलचे मुख्य सचिव प्रविण महाजन, विशेष कार्य अधिकारी सचिन ढोले,महसुचे राहूल गांगुर्डे यांनी शेतकऱ्यांची भावना व पिढ्यान पिढ्या चाललेला संघर्ष पाहून शिव पानंद शेतरस्ता चळवळीला प्रतिसाद देवून दुरध्तनीवरून संपर्क साधत मा. महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी न्यायाची भुमिका घेत तातडीने पत्र देत मुंबई येथिल महसुल कार्यालयामध्ये महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या उपस्थित अधिकाऱ्यांची बैठीक घेवून परिपूर्ण शासन निर्णय बनवून शेतकऱ्यांना सरकार दर्जेदार शेतरस्ते देण्यासाठी बांधील राहील असे आश्वासन दिले. या आंदोलनामागे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत – शेतीच्या सीमांवर असणारे अडथळे, बंद रस्ते, न्यायालयात अडकलेली प्रकरणे आणि सरकारी दुर्लक्ष. या पार्श्वभूमीवर आंदोलनाची गरज होती. मात्र गोरगरीब शेतकऱ्यांनी उन्हाच्या तडाख्यात उपोषणाला बसू नये, या महसूल मंत्री बावनकुळे साहेबांच्या संवेदनशील विचाराने चळवळीचे प्रणेते शरदराव पवळे आणि समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी कानिफनाथ मंदिर जंगलेवाडी श्रीगोंदा येथे तातडीने बैठक घेऊन आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. यावेळी शिरूर व श्रीगोंदा चळवळ कृती समिती सदस्य सुरेश वाळके साहेब व बापुराव जंगले पाटील उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष