By : Polticalface Team ,23-04-2025
                           
               लिंपणगाव( प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जाणारा लिंपणगाव ते मुंढेकरवाडी उंबर फाटा हा जवळपास अडीच ते तीन किलोमीटर अंतराचा प्रलंबित रस्ता डांबरीकरणाचे काम सध्या प्रगती पथावर असून; गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून नादुरुस्त असलेला हा रस्ता काही दिवसातच मोकळा श्वास घेणार आहे. दरम्यान गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून या रस्त्याची म्हणावी तशी यापूर्वी दुरुस्ती करण्यात आलेली नव्हती. अशा तक्रारी ग्रामस्थ व प्रवाशां कडून करण्यात येत होत्या. फक्त वरवर खड्डे बुजवण्याची मोहीम राबविण्यात आलेली होती. परंतु श्रीगोंद्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपाभियंता होके यांनी श्रीगोंदा तालुक्यातील अनेक नादुरुस्त रस्ते दुरुस्ती करून मुख्य रस्त्याला जोडण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला एक सक्षम अधिकारी लाभला आहे तशी चर्चा देखील प्रवासी व ग्रामस्थांमधून होताना दिसते. त्यामध्ये अष्टविनायकापैकी असणारा लिंपणगाव ते मुंढेकरवाडी या रस्त्याची गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून मोठी दयनीय अवस्था निर्माण झाली होती.  या नादुरुस्त रस्त्यासाठी माजी सैनिक प्रकाश चव्हाण; नवनाथ रंधवे; सोपान जाधव; बापूराव कुरुमकर आदींनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करताना या रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांनी देखील वेळोवेळी प्रसिद्धी देऊन सदर रस्त्याचे काम मार्गी लागावे. यासाठी प्रशासनाला प्रसिद्धीच्या माध्यमातून जागे केले. त्यानंतर या दोन ते अडीच किलोमीटर रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सविस्तर प्रस्ताव पाठवून या रस्ता दुरुस्तीसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला. तीन महिन्यापूर्वी याना नादुरुस्त रस्त्यावर खडीकरण करण्यात आले. आता या रस्त्याचे संबंधित ठेकेदाराकडून गेल्या दोन दिवसापासून मजबुतीकरण करून डांबरीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित पडलेला रस्त्याचा प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता होके यांनी देखील विशेष लक्ष घालून सहकार्य केले दरम्यान ग्रामीण भागातील या रस्त्यांच्या प्रश्नासाठी उप अभियंता होके यांनी शासन दरबारी करून छोटे छोटे रस्ते मुख्य रस्त्याला जोडण्याची मोहीम सुरू केल्याने ग्रामीण भागातील ग्रामस्थ व प्रवाशांमधून उपअभियंता होके यांचे कौतुक करण्यात येत आहे. 
     दरम्यान लिंपणगाव ते मुंढेकरवाडी मार्गे; आनंदवाडी; पेडगावकडे मार्गस्थ होणारा हा अष्टविनायकांपैकी एक असणारे भक्तांचे श्रद्धास्थान सिद्धटेकचा सिद्धिविनायक गणपतीच्या दर्शनासाठी प्रत्येक चतुर्थीला याच रस्त्यातून प्रवासी वाहनचालकांना मार्गस्थ व्हावे लागते. परंतु रस्त्याच्या या दयनीय अवस्थेमुळे प्रवासी वाहन चालकांची मोठी कुचंबाना होताना दिसत होती. त्यामध्ये रात्री अपरात्री रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी काटेरी झाडे असल्याने चोरांपासूनही प्रवासी व वाहनचालकांची लूटमार होत होती. अशा परिस्थितीतून सिद्धटेककडे प्रवासी व भक्तांना मार्गस्थ व्हावे लागत होते. याबाबत पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांनी या रस्त्याची सविस्तर अशी पार्श्वभूमी व प्रलंबित रस्त्याचा प्रश्न वेळोवेळी प्रसिद्धीच्या झेतात आणून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. निश्चितच पत्रकार कुरुमकर यांच्या या प्रखर व सडेतोड लेखणीमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील योग्य वेळी दखल घेऊन सदर नादुरुस्त रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. आता रस्त्याचे काम सध्या मोठ्या प्रगतीपथावर असून अनेक वर्षापासून च्या या रस्त्याने आता मोकळा श्वास घेतला आहे. सदर रस्त्याचे उत्तम प्रकारे मजबुतीकरण व डांबरीकरण सुरू आहे. त्यामुळे प्रवासी व ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता होके व पत्रकार कुरुमकर यांनी त्याच्या प्रश्नासंदर्भात मोठे परिश्रम घेऊन या प्रलंबित रस्त्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
              
              
वाचक क्रमांक :
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष