पत्रकार कुरुमकर यांचे पत्रकारितेतील कार्य समाजाभिमुख गटविकास अधिकारी राणीताई फराटे

By : Polticalface Team ,24-04-2025

पत्रकार कुरुमकर यांचे पत्रकारितेतील कार्य समाजाभिमुख गटविकास अधिकारी राणीताई फराटे लिंपणगाव( प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांचे सामाजिक कार्य प्रशंसनीय व समाजाभिमख असून; त्यांचे तालुका प्रशासनाला मौलिक असे सहकार्य लाभत असल्याचे गौरवोद्गार श्रीगोंद्याच्या गटविकास अधिकारी श्रीमती राणीताई फराटे यांनी व्यक्त केले. पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांना नुकताच दैनिक राष्ट्र सह्याद्री समूहाकडून उत्कृष्ट ग्रामीण पत्रकार म्हणून पुरस्कृत केल्याबद्दल श्रीगोंद्याच्या गटविकास अधिकारी श्रीमती राणीताई फराटे यांनी पंचायत समितीत नुकताच सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी गौरवोदगार पर भाषणात गटविकास अधिकारी श्रीमती फराटे पुढे म्हणाले की; पत्रकार कुरुमकर यांनी गेल्या 27 वर्षापासून आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या हितासाठी समाजाभिमुख लिखाण करून तालुका प्रशासनाला देखील मौलिक असे सहकार्य केले. श्रीगोंदा तालुक्याच्या सर्वांगीण विकास होत असताना पत्रकार कुरुमकर यांची भूमिका नेहमीच सकारात्मक असते. पुढे बोलताना फराटे म्हणाल्या की; कुरुमकर यांनी आपल्या सडेतोड लेखणीच्या माध्यमातून प्रत्येक घटकातील समाजाला न्याय देण्याची भूमिका पार पाडली. एक पत्रकारिता व शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची श्रीगोंदा तालुका नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात देखील ओळख आहे. कुरुमकर हे एक संयमी शांत व शिस्तप्रिय व्यक्तिमत्व असल्याने त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून तालुका प्रशासनातील सर्वच अधिकाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले. त्या मैत्रीपूर्ण संबंधातून त्यांनी सर्वसामान्यांना न्याय कसा मिळेल यासाठी अहोरात्र तालुका प्रशासनाची संवाद साधून न्याय देण्याची भूमिका पार पाडत आहे. त्यांना नुकताच दैनिक राष्ट्र सह्याद्री समूहाने जिल्ह्यात ग्रामीण भागातील आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित केले. याचा आम्हालाही सार्थ अभिमान असून; त्यांच्या पुढील कार्यास गटविकास अधिकारी राणीताई फराटे यांनी भरभरून शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी मनोज बनकर; पंचायत समितीचे प्रशासन अधिकारी नागेश लोखंडे; श्रीगोंदा तालुका पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष माधव बनसोडे आदी यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन नागेश लोखंडे यांनी केले. आभार सहाय्यक गटविकास अधिकारी मनोज बनकर यांनी मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी