By : Polticalface Team ,26-04-2025
लिंपणगाव,( प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या वांगदरी ग्रामपंचायत अंतर्गत कोट्यावधींची विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साही वातावरणात पार पडले. दरम्यान या विकास कामांमध्ये वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना व पंधरावा वित्त आयोग या माध्यमातून विविध विकास मंजूर कामांचा समावेश आहे. वांगदरी गावांतर्गत जवळपास नऊ ठिकाणी भूमिपूजन व एक शुद्ध पिण्याच्या पाण्याचा फिल्टर व इतर विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाल्याची माहिती गावचे सरपंच संजय नागवडे यांनी दिली.
यावेळी बोलताना नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले की; वांगदरी गावच्या विकासाचे व्हिजन गावचे सरपंच संजय नागवडे व सर्व सदस्यांनी तनमन धनाने विकास कामात भर घालून विविध योजनेतून विकास कामे राबवत आहेत. या चांगल्या कार्यासाठी यापुढेही आपण ग्रामपंचायत प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे नागवडे यांनी भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी बोलताना सांगितले.
मा. पोलीस पाटील सुभाष गोरे यावेळी म्हणाले की; ग्रामपंचायतच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचे गावच्या विकासात मोठे योगदान लाभत आहे. त्यामुळे नक्कीच गावचा उर्वरित विकासाचा चेहरा मोहरा बदलणार आहे ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले.
शामराव नागवडे यांनी देखील ग्रामपंचायतचा सर्वांगीण विकासासाठी सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य हे गावच्या विकासात भरीव योगदान देत आहे; ही कौतुकास्पद बाब आहे असे सांगितले.
या कार्यक्रमास गावचे सरपंच संजय नागवडे; उपसरपंच छाया दिलीप मासाळ; माजी सरपंच दत्तात्रय मासाळ; माजी सरपंच महेश शेठ नागवडे; माजी सरपंच रामदास भडांगे; माजी उपसरपंच शिवाजी चोरमले; खरेदी-विक्री संघाचे संचालक साहेबराव महारनुर; संस्थेचे व्हॉइस चेअरमन सर्जेराव मासाळ; माजी चेअरमन विजय नागवडे; मा. व्हाईस चेअरमन भाऊसाहेब हंडाळ; माजी व्हाईस चेअरमन भानुदास महारनुर; मोहन महारनुर; काशिनाथ पारखे; तंटा मुक्ती अध्यक्ष श्याम दादा नागवडे; ग्रामपंचायत सदस्य तुषार नागवडे; विकास आढागळे; धनंजय चोरमले; दिलीप मासाळ; हनुमंत काटे; हेमा काका नागवडे; मधु तात्या नागवडे; अशोक मासाळ; पांडुरंग जाधव; भाऊसाहेब चोरमले; झुंबर हंडाळ; सुभाष पाटील गोरे; श्रीमंत मासाळ; कुंडलिक मासाळ; कुंडलिक पारखे; विठ्ठल पारखे; केरू पारखे; झुंबर चोरमले; चांगदेव डोमाळे; अर्जुन डोमाळे; बाळासाहेब हंडाळ; शामराव मासाळ; संतोष वांगणे; पोपटराव राऊत; आप्पासाहेब जगताप; पांडुरंग नागवडे; भालचंद्र नागवडे; शेखर नागवडे; भाऊसाहेब नागवडे; भागुजी मासाळ; जनार्धन चोरमले; निलेश कुंजीर; मोहन ढवळे; आप्पा टुले; दादा टुले; भाऊसाहेब राऊत; धनंजय हंडाळ; जालिंदर हंडाळ; कैलास ढवळे; नारायण ढवळे; सावळा भाऊ चोरमले; मिठू चोरमले; सर्जेराव शिंदे; विलास चोरमले; भीमराव चोरमले; आणि अशोक कांबळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :