रावणगांव हायवे उड्डाण पुलाच्या खाली चालत होता कल्याण मटका जुगार. दौड पोलीसांनी केली कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.
By : Polticalface Team ,27-04-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता २७ एप्रिल २०२५ दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे रावणगाव ता दौंड जिल्हा पुणे-सोलापुर हायवे उड्डाण पुलाच्या खाली सदर इसम नामे नवनाथ तुकाराम भोपाळ, वय 43 वर्षे, रा.रावणगाव,ता.दौड जि.पुणे याने बेकायदा बिगर परवाना कल्याण मटका जुगार नावाचा अवैद्य धंदा चालवत असताना दौंड पोलीसांनी त्यास रंगेहाथ पकडले
या बाबत फिर्यादी नाव अमीर जिलानी शेख पोहवा नेमणुक दौड पोलीस स्टेशन पुणे ग्रामिण सरकार तर्फे आरोपी विरुद्ध दौंड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं 303/2025 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीचे नाव नवनाथ तुकाराम भोपाळ वय 43 वर्षे रा.रावणगाव ता.दौड जि.पुणे असे नमूद करण्यात आले आहे
हि कारवाई दि २४/०४/२०२५ रोजी १७:३० वाजे सुमारास मौजे रावणगांव हद्दीत पुणे-सोलापुर हायवे रोड उड्डाण पुलाच्या खाली. कल्याण मटका नावाची जुगाराचे साधने बाळगुन आपल्या ओळखीच्या लोकांकडून पैसे घेऊन त्यांना जुगार खेळवीत असताना करण्यात आली असे नमूद करण्यात आले आहे यामध्ये जप्त माल :-1)750 रू रोख रक्कम 100 रुपयाची 7 नोटा, 50 रू दराची 1 नोट 2) 5 रू एक निळया रंगाचा बॉल पेन अं.कि.जु.वा.की एक स्लिप बुक त्यावर कल्याण मटका जुगाराचे आकडे लिहिलीले असे एकूण ७५५ रुपयाचा मुद्देमालासह सदर आरोपीस रंगेहाथ पकडण्यात आला असल्याचे दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी सांगितले
हकीकत वर नमूद केले तारीख वेळी व ठिकाणी यातील आरोपी नामे. नवनाथ तुकाराम भोपाळ वय 43 वर्षे रा.रावणगाव ता.दौड जि.पुणे हा त्याच्या कब्जात वरील वर्णाचे बेकायदा बिगर परवाना कल्याण मटका नावाची जुगाराचे साधने बाळगुन आपल्या ओळखीच्या लोकांकडून पैसे घेऊन त्यांना जुगार खेळवीत असताना ७५५ रुपये रोख मुद्देमालासह जागीच मिळून आला. असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध. दौंड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अमलदार पोलीस हवालदार राऊत. पुढील तपास पोलीस अंमलदार भागवत करीत आहेत.
वाचक क्रमांक :