By : Polticalface Team ,27-04-2025
त्यामध्ये कुकडी लाभक्षेत्रात हंडाभर पाण्यासाठी देखील ग्रामस्थ व महिलांची भटकंती सुरू आहे. त्यामुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न देखील तितकाच जटील बनला आहे. कारण गावतळी बंधारे पाण्याअभावी पूर्णतः कोरडे पडले आहेत. दरम्यान कुकडी लाभ क्षेत्रात आवर्तन संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार सद्यस्थितीला 20 एप्रिल पासून पिंपळगाव जोगे धरणातून आवर्तन सुरू आहे. जवळपास सव्वा महिना हे आवर्तन चालू असल्याचे समजते. आणखी किती दिवस हे आवर्तन सुरू होणार हे मात्र कळू शकले नाही. त्यामुळे येडगाव धरणात पाणीसाठा अत्यंत अपुरा असल्याने पिंपळगाव जोगेतून येडगाव धरणात आवर्तन सोडण्यास विलंब होत असल्याचे दिसते. अशा या परिस्थितीत कुकडीचे आवर्तन सोडण्याबाबत जलसिंचनाच्या अधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे असल्यास समजते. त्यामध्ये कुकडीच्या कालवा सल्लागार समितीची बैठक देखील पुढे पुढे लांबली जात आहे. त्यामुळे कुकडी कालव्याचे श्रीगोंदा; पारनेर; कर्जत; करमाळा इत्यादी तालुक्यांना पाणी सोडण्यास मोठा कालावधी लागण्याची शक्यता देखील निर्माण झाल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार पिंपळगाव जोगेतून आणखी पुढे आठ दिवस आवर्तन सुरू राहणार आहे. त्यानंतरच कालवा सल्लागार समितीची बैठक होऊ शकते. असा तर्क देखील वर्तवण्यात येत आहे. कारण पिंपळगाव जोगेतून येडगाव धरणात आवर्तन सोडताना साधारणतः दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी लागू शकतो. तिथून पुढे कुकडी कालव्या द्वारे आवर्तन सुरू होणार आहे. म्हणजे पाऊस आणि कुकडीचे पाणी हे बरोबरच शेतकऱ्यांना मिळू शकते इतका कालावधी आवर्तनाचा लागणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहे.मिळालेल्या माहितीनुसार पारनेर; श्रीगोंदा; कर्जत करमाळा इत्यादी तालुक्यांसाठी जवळपास एका आवर्तनासाठी साडेतीन ते चार टीएम सी पाण्याची आवश्यकता भासते. परंतु चालू वर्षीचा उन्हाळी हंगाम अत्यंत थरारक असल्याने चार टीएमसी च्या पुढेच उन्हाळी हंगामात आवर्तन वाढव्हावे लागणार आहे. परंतु कालवा सल्लागार समितीची बैठकच होत नसल्याने आवर्तनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण कुकडीच्या सर्व जणांमध्ये पाणीसाठा अत्यंत कमी असल्याने आवर्तनाचे कोणते स्वरूप राबवावे. असा प्रश्न देखील जलसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर उभा आहे. एकीकडे आवर्तन अभावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर दुसरीकडे शेती पिके व फळबागांचा प्रश्न गंभीर होत आहे.
त्यामुळे शेती पिकां ऐवजी बहुदा पिण्याच्या पाण्यासाठीच आवर्तन सोडण्याचा हट्टास होऊ शकतो. कारण शेती पिके व फळबागांसाठी उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणी जास्त प्रमाणात लागणार आहे. त्यामुळे कुकडी लाभ क्षेत्रात गावतळी; बंधारे इत्यादींसाठीच हे आवर्तन सोडण्याची दाट शक्यता असल्याचे देखील समजते. त्यामुळे चालू वर्षी उन्हाळी हंगामातील पिकांवर आवर्तना अभावी वरवंटा फिरण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ शकते. जलसिंचन विभागाने शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेत तातडीने कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्याची आवश्यकता आहे. आत्तापासूनच पिंपळगाव जोगेतून येडगाव धरणात फीडिंग सुरू केले तर उन्हाळी हंगामात आवर्तन पूर्ण होऊ शकते. किंबहुना या चारही तालुक्यांना पाणी मिळू शकते. अन्यथा कुकडीतून पाणी मिळण्याची सुतराम शक्यता दिसून येत नाही.
त्यामुळे उन्हाळी हंगामातील कुकडी लाभ क्षेत्रात फळबागा व शेती पिकांचे एका आवर्तनाअभावी कोट्यावधीच्या पुढे नुकसान होऊ शकते. त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार असा सवाल देखील शेतकऱ्यांमधून व्यक्त केला जात आहे. कारण कुकडीच्या मागील आवर्तनाचा श्रीगोंदा तालुक्यात मोठा सावळा गोंधळ निर्माण झाल्याने अनेक शेतकरी कुकडीच्या आवर्तनापासून वंचित राहिल्याने संघर्ष सीगेला पेटला होता. ती परिस्थिती जलसिंचन विभाग या उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांवर येऊ देऊ नये; अशी माफक अपेक्षा देखील कुकडी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
मुख्यअभियंता हेमंत धुमाळ यांच्याशी आवर्तन संदर्भात संपर्क साधला असता ते म्हणाले की आवर्तन व कालवा सल्लागार समितीची बैठकीबाबत संपूर्ण माहिती घेऊन कळवतो असे उत्तर दिले या जर तर च्या उत्तराने शेतकऱ्यांचे कदापिही समाधान होऊ शकणार नाही. प्रतिक्षा कुकडी सल्लागार समितीची बैठक महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन तातडीने आवर्तन सोडावे; अन्यथा कुकडीच्या आवर्तनचा संघर्ष अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून; तशी चर्चा देखील शेतकऱ्यांमधून मोठ्या प्रमाणावर होत आहे.
वाचक क्रमांक :