By : Polticalface Team ,28-04-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (TDF) चे राज्यस्तरीय अधिवेशन शनिवार दि. 26 एप्रिल 2025 रोजी पालघर येथे उत्साही वातावरणात राज्याचे अध्यक्ष शिक्षक नेते श्री.जी.के. थोरात सर यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीपणे संपन्न झाले.
सदर अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. अधिवेशनाच्या प्रथम सत्रामध्ये सर्व शिक्षक बंधू भगिनींना मार्गदर्शन करताना आदरणीय शिंदे साहेबांनी शिक्षण क्षेत्रातल्या अनेक समस्यांवर आपले मत व्यक्त केले व भविष्य काळामध्ये या सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीच्या वतीने आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांना शिक्षण क्षेत्रातल्या विविध समस्यांचे निवेदन देण्यात आले यामध्ये प्रामुख्याने शिक्षक व शिक्षकेतर भरती, शिक्षकांची अशैक्षणिक कामे, पवित्र पोर्टल, निवड श्रेणी,पेसा अंतर्गत भरती या समस्यांचा समावेश होता.
महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री आदरणीय दादा भुसे साहेब यांच्याबरोबर टीडीएफच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र मीटिंग चे आयोजन करून त्या सोडवण्याबाबतचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. या अधिवेशनात महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीच्या अपरांत या स्मरणिकेचे प्रकाशन मा.मंत्री महोदयांच्या व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्य संघटनेच्या वतीने राज्याचे अध्यक्ष जी. के. थोरात सर व कार्याध्यक्ष नरसु पाटील यांच्या हस्ते माननीय मंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब यांचा सन्मान करण्यात आला.
यापूर्वी प्रथम सत्रामध्ये एबीपी माझाचे प्रसिद्ध वृत्त निवेदक प्रसन्न जोशी सरांनी उपस्थित शिक्षक बंधू-भगिनींना मार्गदर्शन करताना शिक्षक हा समाज परिवर्तन प्रक्रियेतील प्रमुख घटक असून त्याचे मोलाचे योगदान स्पष्ट केले तसेच राज्यातील विविध शैक्षणिक समस्यांची चर्चा करून त्या शासन स्तरावर सोडवण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. येणाऱ्या काळामध्ये शिक्षकांना व एकूणच शिक्षण क्षेत्राला न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षकांचे महामंडळ असण्याची आवश्यकता असे मत व्यक्त केले.
यावेळी महाराष्ट्राचे शिक्षक लोकशाही आघाडीच्या वतीने राज्यातील शिक्षकांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.यानंतर विविध शोधनिबंधांच्या माध्यमातून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, खाजगी कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्ती यावर चर्चा करण्यात आली.
अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीला शिक्षकांचे सोडवण्यासाठी सर्वपोतरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी ही शिक्षकांसाठी अतिशय कौतुकास्पद कार्य करत असल्याबद्दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
यावेळी आदरणीय श्री. उदयजी सामंत,माजी मंत्री राजेंद्र गावित, खासदार डॉ. हेमंत सावरा साहेब,आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार राजेश पाटील, शिक्षणाधिकारी सौ.संगीता भागवत अध्यक्ष जी. के. थोरात सर कार्याध्यक्ष नरसू पाटील सर यांच्या यांच्या हस्ते राज्यातील शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार आदरणीय निरंजन डावखरे, पालघर चे खासदार डॉ. हेमंत सावरा साहेब यांनी आपली मनोगते व्यक्त करून अधिवेशनास शुभेच्छा दिल्या.
या अधिवेशनामध्ये आपल्या पुणे जिल्ह्यातील सहा शिक्षकांना राज्यस्तरीय गुणवंत पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच आपल्या पुणे विभागाचे अध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव कामथे सरांचा तसेच राज्य कार्यकारिणीच्या सदस्यांचा माननीय उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी राज्यभरातून जवळपास 2000 शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते आपल्या पुणे जिल्ह्यातील जवळपास 150 पदाधिकारी व शिक्षक बंधु भगिनी अधिवेशनास उपस्थित लावली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष आदरणीय नरसु पाटील सरांनी केले तर आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये राज्याचे अध्यक्ष जी.के. थोरात सर यांनी संघटनेची गरज व महत्त्व स्पष्ट करून येणाऱ्या काळामध्ये शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य टीडीएफ कटिबद्ध असल्याचे मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे शिक्षकांच्या हक्कासाठी अविरतपणे संघर्ष करण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन त्यांनी सर्व शिक्षक बंधू-भगिनींना केले. यावेळी त्यांनी सर्व जीवनगौरव पुरस्कार व राज्य गुणवंत शिक्षक/ शिक्षिका पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे हा सोहळा भव्य दिव्य देखणा केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले व भविष्यामध्ये दरवर्षी अशा अधिवेशन भव्यदिव्य करण्याचा मानस व्यक्त केला.
अशा रीतीने अधिवेशनाचा भव्य, दिव्य व नेटका सोहळा उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला.
हे अधिवेशन भव्य दिव्य,नेटके व दिमाखदार करून सर्वच बाबतीत यशस्वी करण्यात मोलाचा सहभाग असणाऱ्या पालघर येथील जीवन विकास शिक्षण संस्था आणि शिक्षण महर्षी स. तू.कदम विद्यालय आणि सर्व संकुलाचे प्रमुख श्री.वागेशजी कदम, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ,तसेच महाराष्ट्र टीडीएफचे सचिव के.एस. ढोमसे सर, कोकण विभाग प्रमुख सागर पाटील, संतोष पावडे, पालघर जिल्हा अध्यक्ष गणेश प्रधान, पुणे विभाग प्रमुख शिवाजीराव कामथे सर, नामदेव पाटील सर, मायकल गोन्सालवीस सर, रुपेश वझे, प्रमोद पाटील, सर्व राज्य कार्यकारणी सदस्य तसेच पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ सहकारी पतपेढीच्या सर्व संचालक मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले. या मान्यवरांचे मनःपूर्वक आभार.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.
ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.
दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले
कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.
देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय
नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक