श्री व्यंकनाथ विद्यालयाकडून वसुंधरा सप्ताह उत्साहात साजरा
By : Polticalface Team ,28-04-2025
लिंपणगाव (प्रतिनिधी )श्रीगोंदा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्री व्यंकनाथ विद्यालयाकडून वसुंधरा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.. या सप्ताह कालावधीत विद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शाळा व गावचा परिसर स्वच्छ केला.
यानिमित्ताने पर्यावरणाचे महत्त्व पटवून देत एक सामाजिक बांधिलकी जोपासून या सप्ताह सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी मनसोक्त असा सहभाग नोंदवला. या वसुंधरा सप्ताह सोहळ्याच्या निमित्ताने विद्यालयात निबंध व वकृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. (लहान गट इयत्ता पाचवी ते सातवी) प्रथम क्रमांक काकडे कार्तिक मनोज; द्वितीय क्रमांक काकडे ऋतुजा संतोष; तर तृतीय क्रमांक कुमारी लकडे शर्वरी ज्ञानेश्वर;--: मोठा गट!( इयत्ता आठवी ते नववी)- निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कुमारी वडवकर आर्या राजेंद्र; द्वितीय क्रमांक गोरखे वैष्णवी दत्तात्रेय; तृतीय क्रमांक काकडे सुप्रिया शरद व कल्याणी विजय बरकडे; वकृत्व स्पर्धा मोठा गट:-( इयत्ता आठवी ते नववी) प्रथम क्रमांक कापसे गीतांजली नवनाथ; द्वितीय क्रमांक उंडे प्रांजल संभाजी; तर तृतीय क्रमांक अनुश्री अमोल जठार आदी विद्यार्थ्यांनी गुणांक्रम मिळवले या उपक्रमशील विद्यार्थ्यांचे स्कूल कमिटीचे अध्यक्ष डी आर काकडे; विश्वस्त विलासराव काकडे; पुरुषोत्तम बापू लगड; खंडेराव काकडे; अकबर भाई इनामदार; मनेष पाटील जगताप; प्राचार्य ए. एल. पुराणे यांच्यासह स्कूल कमिटीचे सर्व सदस्य त्याचबरोबर शिक्षक व शिक्षकेतर वृंदांनी अभिनंदन केले आहे.
वाचक क्रमांक :